विषय «आरोग्य»

नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा

पाच ठळक गोष्टी नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा काय स्वरूप धारण करील हे ठरवतील.

पहिली असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण ज्याचा पुरेसा ऊहापोह शिक्षणावरच्या लेखात झाला आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण जरी घटत चालले असले तरी त्यांचे प्रमाण एकूण वैद्यक व्यवसायामध्ये अगदी कमी होईल हे शक्य नाही. त्यामुळे सांसर्गिक व असांसर्गिक रोग्यांचा दुहेरी भार आपल्याला वाहावा लागणार आहे.

दुसरी ठळक बाब म्हणजे विमायोजनांचे आरोग्यसेवेत पदार्पण. तिसरी बाब वैद्यकीय पर्यटन (medical tourism) व चौथी पेटंट्स् आणि औषधे. विमा प्रभागात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देता देता, सरकारने सार्वत्रिक आरोग्यविमा योजना आखल्या आहेत.

पुढे वाचा

पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ

(‘कोणत्याही लाभासाठी सत्याचा सोईस्कर भागच पुढे ठेवणे म्हणजे स्वतःला फसवणे. हे टाळायचे असेल तर तुम्ही ज्या गृहीतांवर आधारित प्रयोग करता, ती गृहीतेही तपासून पहायला हवीत,’ रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञाचे हे मत. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमातील गृहीतकांची ही तपासणी)

पोलिओ आजार पूर्णपणे, कायमचा उखडून टाकायचा यासाठी पोलिओ-निर्मूलन कार्यक्रम सरकारने गेली १० वर्षे हातात घेतला आहे.

इ.स. २००० पर्यंत पोलिओ निर्मूलन होईल असे आधी जाहीर करण्यात आले होते. सरकारची सर्व आरोग्य-सेवा यंत्रणा या पोलिओ-लसीकरणाच्या कार्यक्रमाला जुंपली गेली. पण पोलिओच्या केसेस होतच गेल्या व ‘पोलिओ-निर्मूलना’साठीची ‘डेड लाइन’ दरवर्षी पुढे ढकलण्यात आली.

पुढे वाचा

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा