विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार

प्रस्तुत लेखात कै. दा.म. जोशी यांच्या कादंबर्‍यांच्या साह्याने त्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाचा आलेख काढण्याचे योजिले आहे. तात्त्विक कादंबर्‍यांचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकाच्या कादंबर्‍यांत त्याच्या तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले असेल असे मानणे गैर ठरू नये.

जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा काल १९१५ ते १९.३० असा वीस वर्षांचा आहे. या अवधीत त्यांनी एकूण पाच कादंबर्‍या लिहिल्या. या पाचही कादंबर्‍यांचा विषय प्रामुख्याने एकच — म्हणजे स्त्रीजीवन — आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी भारतीय समाजजीवनात जे मन्वंतर सुरू झाले होते, त्यातील महाराष्ट्रीय स्त्रीच्या जीवनात निर्माण झालेल्या समस्यांची समीक्षा या कादंबर्‍यांत त्यांनी केलेली आहे.

पुढे वाचा

कै.वा.म. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने

२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, लेखनाचा के अध्यापनाचा स्थायीभाव होता. सहिष्णुता, वात्सल्य, प्रेम, त्याग, साधुत्व हे गुण त्यांच्या अंगाखांद्यावर एखाद्या लडिवाळ बालकाप्रमाणे निर्धास्तपणे खेळत, बागडत. आपल्या साठ वर्षांच्या आयुष्यात त्यांना अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले.

पुढे वाचा

प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.

पुढे वाचा