मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९९

मुस्लिम समाज-सुधारकांची परिषद

नोव्हेंबरच्या २० आणि २१ या तारखांना पुणे येथे एस. एन. डी. टी. कॉलेज, कर्वे रोड, पौड फाटा या ठिकाणी एक मुस्लिम महिला परिषद होणार आहे. देशभरातून महिलांना या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तींची राहण्याखाण्याची व्यवस्था परिषदेच्या जागी होईल. ज्यांना प्रवासाचा खर्चही झेपणे अवघड आहे त्यांना दुस-या वर्गाचे रेल्वेचे भाडे मिळेल. ही परिषद ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ या संस्थेच्या वतीने होत आहे. तिचे जनरल सेक्रेटरी श्री. सय्यदभाई, पुणे ह्यांनी आगामी परिषदेचे माहितीपत्रक आमच्याकडे धाडले आहे. या परिषदेत मुस्लिम महिलांच्यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत.

पुढे वाचा

हिंदू-मुस्लिम सहजीवन

‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र आता उलट फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही. ही आठ कोटी माणसे आपण काही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाची मुल्लामौलवींच्या संधीसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे.

पुढे वाचा