भगवद्गीतेची सामाजिक आणि आर्थिक अंगे
‘भगवद्गीता’ हा महाभारत या भारतीय महाकाव्याचा एक भाग आहे. गीतेच्या १८ अध्यायात पांडववीर अर्जुन आणि त्याचा यदु (कुलोत्पन्न) सारथी श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार, यांच्यात झालेल्या संवादाचा संजयाने सांगितलेला वृत्तान्त आहे. प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला युद्धात होणाऱ्या आपले भाऊ आणि कुलबंधू यांच्या संहारात त्याला जो महत्त्वाचा वाटा उचलावा लागणार होता त्याच्या विचाराने त्याबद्दल घृणा …