अमोल पदवाड - लेख सूची

चोम्स्कींचा भाषाविचार

आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या …

पर्यावरणवादाचा अन्वयार्थ

(१) मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग …