इतिहासाचार्य वि. का. राजवाडे - लेख सूची

दुर्बोध!

तसेंच लोकस्थिति सुधारावयाची असेल तर ती आंतून सुधारली पाहिजे. लोकांमधील परस्पर-संबंध काय आहेत, त्यांनी स्थापिलेल्या संस्थांचे हेतु काय असतात, राजाचा अधिकार किती असावा आणि प्रजेचे हक्क कोणते आहेत, ते इतकेच कां असावेत आणि जास्त का नाहीत; धर्म, नीती, जाती इत्यादि बंधनें अस्तित्वांत कां आलीं व कशी आली हे व असलेच आणिक प्रश्न जे लाखों आहेत, …

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती

भाषा, वर्ण, इत्यादींची दैवी (?) उपपत्ती इतिहासाचार्य वि.का. राजवाडे एणेप्रमाणे (१) ध्वनीपासून भाषा, (२) रंगीत किंवा साध्या रेखाचित्रांपासून अक्षरमालिका, (३) नैसर्गिक हावभावांपासून कृत्रिम अभिनय, व (४) पाहिलेल्या आकृतींपासून बनावट भांडी-अशा चार कृत्रिम व्यावहारिक कला मनुष्याने आपल्या अकलेने संपादन केल्या. शेकडो टक्के टोपणे खाऊन व हजारो प्रयोगांत फसून मनुष्याला या चार नित्योपयोगी कला परम कष्टाने व …