किशोर जामदार - लेख सूची

आमची इयत्ता कोणती?

आपल्याला स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आहेत. खूप ढोलताशे वाजवून नुकताच आम्ही ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पण स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडून पाहिला तर चित्र फारसे सुखावह नाही, असेच दिसते. देश म्हणून आपल्या उपलब्धींचा आपण उदो-उदो करू शकतो. आर्थिक पातळीवरही बऱ्यापैकी प्रगती दिसते. पण समाज म्हणून मात्र आमची फारशी प्रगती झालेली नाही. सरंजामशाहीच्या काळात किंवा …

ग्रामस्वराज्याचा शिल्पकार

उन्नत आदर्शांचे आकर्षण करोडो लोकांना असते. पण आयुष्यात उतरवणे अशक्य वाटून ते आदर्श केवळ पुस्तकी आहेत, असे ठरवून ते त्या आदर्शांचा पिच्छा करणे सोडून देतात. त्या आदर्शांवर जगण्याची इच्छा बाळगून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारेदेखील लाखो असतात. संपूर्ण जग ज्या दिशेने जात आहे, त्या प्रवाहाच्या विपरीत पोहतांना नाकातोंडात पाणी जाऊन दमछाक झाल्यामुळे, कालांतराने प्रवाहासोबत वाहू लागणारेही …

खरे लाभार्थी कोण?

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार ह्यांनी लोककल्याणकारी योजना म्हणून अनेक योजनांची घोषणा केली. त्यात ‘लाडकी बहीण योजने’सोबतच, बेरोजगार युवकांसाठी शिकाऊ उमेदवारीची (apprenticeship) योजनादेखील जाहीर केली. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात ह्या योजनेचे बारसे करून त्याला ‘लाडका भाऊ योजना’ असे नावदेखील दिले. ह्या योजनेत दरवर्षी महाराष्ट्रातील १० …

लोकशाही संवर्धन 

सध्या भारतीय राजकारणात जे काही सुरू आहे, त्यास अराजक म्हणावे की हुकुमशाही किंवा आणखी काही? पण ती लोकशाही नाही हे मात्र नक्की. लोकशाही म्हणजे केवळ लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने कारभार चालवणे एवढाच मर्यादित अर्थ घेतला तर निश्चितच, ही लोकशाही आहे असे म्हणायला हरकत नाही. पण लोकशाही म्हणजे ‘लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य’ ह्या अर्थाने मात्र …