बलात्कारी मानसिकता कशी घडते?
बलात्कारी मानसिकता कशी घडते? ह्या प्रश्नाकडे वेगळ्या अंगाने पाहण्याची शक्यता पडताळण्यासाठीचा हा यत्न समजावा. मी मानसशास्त्राचा अभ्यासक नव्हे; पण ‘अथातो कामजिज्ञासा’ म्हणून ह्यात डोकावतो एवढेच! आपल्या वाचनात , ऐकण्यात पुरुषांनीच केलेले बलात्कार येतात. स्त्रीदेखील पुरुषाला मोहात पाडते, वश करते, सिड्यूस करते; पण बलात्कार केल्याचे मी कधी वाचले, ऐकले नाही. ह्यासाठी केवळ पुरुषांची जास्त शक्ती किंवा …