डी. डी. कोसंबी - लेख सूची

भारतामधील पहिले नगर

भारतामधील पहिल्या नगराच्या उगमाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. मानवी संस्कृती ही नागरी समाजजीवनाशी आणि म्हणूनच नगरांशी निगडित असते. भारतामधील नगरांचा उदय हा आधुनिक यंत्रयुगाच्याही आधी किंबहुना सरंजामशाही काळाच्याही पूर्वी झाला होता.गेल्या शतकापर्यंत पहिल्या भारतीय नगराचा पाया इ.स.पू. १००० वर्ष घातला गेला होता अशी समजूत होती. वायव्येकडून आलेल्या आर्यांच्या टोळ्या पूर्वेकडे, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात पसरल्या आणि स्थिरावल्या. त्यानंतर …