डॉ. नरेन्द्र दाभोलकर - लेख सूची

माझे आध्यात्मिक आकलन

दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. …

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना …