डॉ. न. ब. पाटील - लेख सूची

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात

एक वृत्तान्त : मराठी भाषेची सद्यःस्थिति आणि भवितव्य या विषयावर कोकण मराठी साहित्य परिषदेत (को.म.सा.प.) परिसंवाद झाला. प्रत्यक्षात ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात’ अशा शब्दात विषय मांडला तरी आशय तोच. न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे हे परिसंवादांचे अध्यक्ष होते. आणि मुंबईसकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त भाषासंचालक डॉ. न. ब. पाटील आणि सुरेश नाडकर्णी हे वक्ते होते. …

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद

जून १९९४ च्या अंकातील डॉ. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख वाचला. रामकृष्णांच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय, हा या लेखाचा विषय आहे. ते तसे सिद्ध होत नाही या निष्कर्षाप्रत लेखक आलेला आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी लेखकाने, नाटकातील शिवाची भूमिका करतानाचा रामकृष्णांचा भावावेश, वेषांतर करून एका घरंदाज कुटुंबातील अंतःपुरात …