डॉ. सुशीला पाटील - लेख सूची

स्फुट लेख

भांडवलाचे वास्तव स्वरूप एप्रिल ९१ च्या अंकात महागाई नाही – स्वस्ताई! या नावाचा स्फुट लेख लिहिलेला आहे. त्यानंतर आज भांडवलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी नजरेने जगाकडे पाहण्याची ही एक खटपट आहे. कोणतेही उत्पादन करावयाचे असेल तर त्यासाठी भांडवल, श्रम आणि भूमि आणि कच्चा माल या चार वस्तूंची गरज असते हे आपण सगळेच जाणतो, …

सत्यशोधक वामन मल्हार जोशी

वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत. वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे …