देवेंद्र इंगळे - लेख सूची

विषमतेची भारतीय स्थिती

भारताच्या संदर्भात असुरक्षित आघातग्रस्त (व्हल्नरेबल) मानवसमूहांचा विचार करावयाचा झाल्यास आपल्याकडील असे सामाजिक घटक कोणते? त्यांच्या असुरक्षिततेची पाळेमुळे कशात आहेत? संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) २४ जुलै २०१४ रोजी प्रसृत केलेला मानव विकास अहवाल सांगतो की, दलित, आदिवासी, स्त्रिया आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा असुरक्षित आघातग्रस्त मानवसमूह म्हणून विचार करावा लागतो. परंतु हे आघातग्रस्त कोण, याचे दिग्दर्शन देशांतर्गत …

‘मानव विकास अहवाला’त भारत

गाझा पट्टीत होत असलेल्या मानवी हक्क हननाविरुद्ध ‘युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स काऊन्सिल’ ने मांडलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने ज्या दिवशी मतदान केले त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २३ जुलै २०१४ रोजी ‘जागतिक मानव विकास अहवाल- २०१४’ प्रसिद्ध झाला. दर वर्षी प्रसिद्ध होणारा हा ‘मानव विकास अहवाल’ म्हणजे जगातील प्रत्येक देशासाठी स्वत:ला आरशात न्याहाळून घेण्याची एक संधी असते. …

उत्क्रांतिसिद्धान्त, जात आणि जनुके

जाति-विभङ्ग पाणानं, अनामना हि जातियो ।। एवं नत्थि मनुस्सेसु, लिङ्गं जातिमयं पुथु ।।* – तथागत गौतम बुद्ध (मनुष्येतर) प्राणिमात्रांमध्ये भिन्नभाव दाखविणाऱ्या जाती असतात; पण मनुष्यांमध्ये पृथक्ता दाखवणारे जातिमय लिंग नसते. (मज्झिमनिकाय, वासेट्ठसुत्त (२.४८.२.३), उद्धृत – शरद पाटील, दासशूद्रांची गुलामगिरी, खंड १ : भाग २, प्राज्ञ प्रकाशन, वाई, १९८७, पृ. ४५८) उत्क्रांतिसिद्धान्ताने चार्ल्स डार्विनला (१८०९-१८८२) इतिहासात …