ना. वा. गोखले - लेख सूची

मी आस्तिक का आहे?

मी आस्तिक आहे का नास्तिक आहे, याबद्दल निश्चितपणे काही सांगायला मी कचरतो. माझी हिंमत होत नाही. तरीपण, पुढील कारणांस्तव मी मला स्वतःला ‘आस्तिक’ म्हणणेच योग्य ठरेल. ‘मी आहे’ म्हणजे, माझा देह आहे व ह्या देहात ‘देह नसलेली’ एक शक्ती आहे, म्हणजेच देहात आत्मा आहे. देह ही जड वस्तू आहे. आत्म्याशिवाय देह ही जड वस्तू नाश …

पत्रव्यवहार -आस्तिकतेचे मंडन व खंडन

आजचा सुधारक, जानेवारी १९९५ च्या अंकातील प्रा. रेगे व प्रा. देशपांडे ह्या दोघांचेही लेख वाचले. तुल्यबल युक्तिवादकांचे युक्तिवाद प्रयत्नपूर्वक समजून घेण्यात ‘बौद्धिक व्यायाम झाला व सात्त्विक करमणूकही झाली. प्रा. रेगे यांचा अनुभव मला सहज समजला. कारण तोच अनुभव मीही घेतलेला आहे. प्रा. देशपांडे यांचा युक्तिवादही मला समजला. कारण स्वानुभव क्षणभर बाजूला सारून मी ही आस्तिकतेच्या …

गांधींचे सत्य

श्री. देशपांडे (दि. य.) यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानांतील सत्याच्या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर’ गूढ आणि अनाकलनीयच राहिला, त्या ऐवजी तो स्पष्ट व आकलनीय व्हायला हवा होता. गांधींचा स्वतःचा ‘सत्याचा शोध त्यांच्या आत्मचरित्रांतील अवतरण देऊन, दि.यं.नी त्यावर निराशाजनक असा अभिप्राय दिला आहे. God is Truth व …

मला उमगलेले डॉ. आंबेडकर

आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करीत असताना मी एक टिपण टिपले. ते असे —- अस्पृश्यतेचे चटके बसलेले आंबेडकर जर साहित्यिक बनले असते, तर विद्रोद्दा व संघर्षाची भाषा स्वीकारून, त्यांनी ‘दलित साहित्य’ निर्माण केले असते. पण असे ‘साहित्यिक’ ते झाले नाहीत. ते ‘समाजसुधारक’ झाले. मृाची भावना जोपासण्याऐवजी त्यांनी क्रांतिकारकता जापासली. ते ‘समतेचे’ पुरस्कर्ते बनले. सामाजिक व आर्थिक ममतेप्टे …