फकरुद्दीन बेनूर - लेख सूची

मराठी भाषा आणि मुसलमान

फाळणीच्या जमातवादी राजकारणाने बोलीभाषा आणि मातृभाषांचे केलेले धार्मिकीकरण आणि राजकीयीकरण यामुळे भारतात भाषेचा प्रश्न हा राजकीय प्रश्न झालेला आहे. भाषावार राज्यनिर्मितीनंतर द्रमुक, अद्रमुक, अकालीपक्ष, शिवसेना यांसारख्या पक्षांनी भाषिक अस्मितेच्या भावनिक राजकारणाची भर घातल्याने गुंता वाढलेला आहे. फाळणीच्या काळातील धर्म-भाषा-राष्ट्र यांची सांगड घातली गेल्याने, सर्वांनी गृहीत धरले आहे की, भारतातल्या सर्व मुसलमानांची उर्दू ही मातृभाषा असून …

समान नागरी कायदा – त्याचे राजकारण आणि स्त्रियांच्या न्यायाचा प्रश्न

अगदी सुरुवातीपासूनच समान नागरी कायद्याच्या निर्मितीला भारतातल्या धार्मिक राजकारण करू पाहणार्‍या गटांचा विरोध होता. मुस्लिमांच्या परंपरा-प्रिय धर्मगुरूंनी, आणि नेत्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला असला तरी, समान नागरी कायद्याची प्रस्थापना करा असे म्हणणारे चौधरी हैदर हुसेन यांच्यासारखे कायदेपंडित घटनासमितीत देखील होते. त्यांनी म्हटले होते की, हिंदू कायदा व मुस्लिम कायदा काढून सर्व जातीजमातींना आधुनिकत्वाच्या तत्त्वावर आधारित …

इस्लाम आणि लैंगिकता

आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या …

आगरकर आणि हिंदू-मुस्लिम प्रश्न

महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत विवेकवादाचे अध्वर्यु गोपाळराव आगरकर यांचे स्थान हे अग्रमानाचे आहे. गोपाळराव आगरकरांनी विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेच्या विचाराला राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही जास्त महत्त्व दिलेले होते. अर्थात सामाजिक प्रश्नांवर लढत असतानाच आगरकरांनी राजकीय प्रश्नांना चाच्यावर सोडलेले नव्हते. नातू देशपांडे संपादित “आगरकर-वाङ्मयाच्या दुसर्‍या खंडात आगरकरांचे राजकीय विषयावरील लेख आहेत. त्यांमध्ये त्यांनी मुंबईत आणि इतर ठिकाणी झालेल्या हिंदू-मुसलमान …