राम बापट - लेख सूची

मानवजातीचे डोळस संमीलन

समाजातील तंत्रविज्ञानाचा व अधिकतम प्रावीण्याचा विस्तार जोवर चालू असतो, तोवर प्रत्येक समाज बाहेरच्या समाजांच्या दडपणाला समर्थपणे तोंड देतो. किंबहुना तो फारच रसरशीत असला, तर दुबळ्या समाजांचे शोषण करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. पण याउलट तो एकदा घसरगुंडीला लागला की, त्याचा अन्य समाजांशी चाललेला संघर्ष अधिकाधिक कष्टप्रद आणि अपयशी होऊ लागतो. जरा वेगळ्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे एखादी …

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी विज्ञान हेच एकमेव असे मानवी ज्ञानाचे स्वरूप आहे असा आक्रमक विवेकवाद (सायंटिसिझम) आणि अतीत तत्त्व माणसांतच अंतर्भूत असते हे मानणारा विवेकवाद यांत फरक आहे. हे न जाणल्याने विज्ञान व आत्मज्ञान यांची एकता तर सोडाच, पण शांततामय सहजीवन मान्य करणे अनेक पुरोगाम्यांना जड जाते. मुळात नीतिनिरपेक्ष असलेल्या विज्ञानाला आत्मज्ञानच योग्य ते सामाजिक …