रा. के. पाटील - लेख सूची

सहकारी ग्रामीण पतव्यवस्था

संयुक्त प्रागतिक आघाडीचे युपीए सरकार केंद्रात स्थापन झाल्यावर समान किमान कार्यक्रम जाहीर झाला. हा कार्यक्रम आघाडीच्या सर्व घटकांनी मंजूर केला व त्याप्रमाणे जमेल तशी अंमलबजावणी चालू आहे. या कार्यक्रमांत सहकार या विषयावर दोन मुद्दे अंतर्भूत केले आहेत. आज ग्रामीण सहकारी पतव्यवस्था दयनीय अवस्थेत आहे. थकबाकी, भ्रष्ट व्यवहार, अकार्यक्षम नोकरशाही, बेताल नेतृत्व यामुळे काही राज्यांत ही …

“माणसाला जमीन किती लागते व त्याहून जास्त वापरली तर चंगळ!”

काही वर्षांपूर्वी काझीरंगा अभयारण्याला गेलो असता, एक गंमतीची गोष्ट पाहिली. गेंड्याच्या लीदीचे चारपाच ढिगारे पाहिले. त्यांनी मर्यादित केलेली जमीन दोन-अडीच हेक्टर होती. कर्मचाऱ्यांशी चौकशी करता असे कळले की हे काम कर्मचाऱ्यांनी केले नसून गेंड्यानेच तसे ढीग घातले आहेत. आपल्या जागेचे स्वामित्व दाखवण्यासाठी गेंड्याची ती युक्ती होती. हत्तीप्रमाणे गेंडा कळपात रहात नसल्यामुळे एका गेंड्याला जगण्यासाठी किती …