वि. शं. ठकार - लेख सूची

नद्या आणि माणसे 

‘आजचा सुधारक च्या एप्रिल-04 च्या अंकातील ‘माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ लेखावर प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर त्यात काही भर घालण्याच्या उद्देशाने हे लिहीत आहे. नद्या जोडणी महाप्रकल्पाविषयी जी काही माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे, आणि एकंदरीतच भारतासह जगभरातील जल प्रकल्पांच्या इतिहासातून जी माहिती मिळते, ती एकत्रितपणे पाहिली तरी या महाप्रकल्पाला कडाडून विरोध करावा, किती केला …

आजचे विज्ञान आणि अध्यात्म : उत्तरे व समारोप

या विषयावरील माझा लेख आसुच्या जाने फेब्रु. विशेषांकात प्रसिद्ध झाला. त्याचा उल्लेख करून नव्हे, परंतु त्यातील विषयाशी संबंधित असे काही भ. पां. पाटणकर यांनी लिहिले (मार्च, एप्रिल). ‘दुसरी बाजू’ या शीर्षकाखालील वसंत त्रिंबक जुमडे यांनी लिहिले (एप्रिल). काही मित्रांनी प्रत्यक्ष भेटीत प्रतिक्रिया दिल्या. या सर्वांवर लिहून या विषयाचा माझ्यापुरता समारोप करीत आहे. सगळीच सामान्य माणसे …

आजचे विज्ञान आणि अध्यात्म

रस्तोरस्ती कानाला मोबाईल फोन लावून चालणारी सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत माणसे पाहिली म्हणजे जाणवते, विज्ञानाची किती झपाट्याने घोडदौड चालू आहे! परवा आमचा एक तरुण भाचा लग्न ठरल्याचे सांगत आला, आणि खिशातला फोन काढून, ‘बोला ना तिच्याशी’ असे म्हणत, बटने वगैरे न दाबता, नुसते ‘नीलिमा’ अशी हाक मारून आपल्या भावी बायकोला आमची ओळख करून देऊ लागला, तेव्हा अवाक् …