परस्परावलंबनाविषयी आणखी काही - लेख सूची

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (१)

अंदाजे दोन वर्षांपूर्वी मी काही अर्थकारणविषयक लेख लिहिले. ह्या लेखांची सुरुवात खादीपासून केली असली तरी त्यांचा प्रतिपाद्य विषय ‘अर्थकारणातील सुधारणा’ हा आहे. माझ्या ह्या लेखांवर काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांमध्ये मुख्यतः डॉ. चिं. मो. पंडित आणि श्री. भ. पां. पाटणकर ह्या दोघांनी माझ्या लेखांत मनापासून स्वारस्य दाखविले. पाटणकरांच्या आणि पंडितांच्या काही मुद्द्यांवर माझे म्हणणे मी …

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (२)

७. (क) मोहनी: आम्ही आम्हाला पैसा जास्त मिळाल्याने श्रीमंत होत नाही, तर आमच्या परिश्रमांच्या मोबदल्यात आपल्याला किती उपभोग मिळाला ते पाहून पूर्वीइतक्याच श्रमांत जास्त उपभोग मिळत असेल तरच आम्ही संघशः आणि त्यामुळे सरासरीने व्यक्तिशः श्रीमान् झालो आहोत हे समजू शकते.(ख) पंडित: ह्याला अर्थ नाही. एक उपाशी तर दुसरा तुडुंब! सरासरीने दोघेही अर्धपोटी!(ग) मोहनी: वरील वाक्यात, …

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (३)

१०. (क) मोहनी : उपयोग्य वस्तूंची विपुलता निर्माण करूनसुद्धा समता आणणे शक्य आहे. (ख) पंडित: अमेरिकेमध्ये सुद्धा हे शक्य झालेले नाही. तेव्हा किती विपुलता आणखी आणावयाची? मुळात समानता आणणे हेच चुकीचे ध्येय असू शकेल. (ग) मोहनी: उपभोग्य वस्तूंची जोपर्यंत वाण असते तोपर्यंत स्पर्धा आणि तिच्या निमित्ताने होणारी हाणामारी कायम राहणार. म्हणून गरजेच्या वस्तूंचे पुरेसे (adequate-optimum) …