साहित्यातून विवेकवाद स्टाइनबेक - लेख सूची

साहित्यातून विवेकवाद (१) – स्टाईनबेक

[साहित्यातून विवेकवाद नावाने काही लेखांमधून काही साहित्यकारांचे लिखाण तपासणारी ही लेखमाला आहे. काही थोडे अपवाद वगळता मराठी साहित्य व्यक्तिगत व कौटुंबिक भावभावनांमध्येच गुंतलेले असते. अपवादापैकी वा.म.जोशींवर आजचा सुधारकने विशेषांक काढला होता (डिसें. 1990-जाने. 1991, अंक (1 : 9-10). जरी लेखमाला मी सुरू करत आहे, तरी इतरांनाही या मालेतून साहित्य व साहित्यिक तपासण्यास आम्ही आवाहन करत …

साहित्यातून विवेकवाद (२) – जॉर्ज ऑर्वेल

स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट …

साहित्यातून विवेकवाद (३) – होम्स ते हॅनिबल : इंग्रजी डिटेक्टिव्ह कथा

नववी ते अकरावी या वर्गात शिकत असताना मी एक सुयोग भोगला. आमच्या वर्गशिक्षिकाच ग्रंथालयप्रमुख होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एका आठवड्यात एकच पुस्तक वाचायला घरी नेता येत असे. आम्हा काही जणांना मात्र तीनचार दिवसांनीच पुस्तक बदलायची मुभा मिळाली! बरीच पुस्तके आम्ही कर्तव्य म्हणून वाचत असू (उदा. शेक्सपिअरची हिंदी भाषांतरे); पण काहींची मात्र प्रेमाने पारायणे होत. यांत …

साहित्यातून विवेकवाद (४) – जॉन बर्जर

निसर्ग माणसांना धार्जिणा नाही. तो (खरे तर ती व्यवस्था) कोणत्याच सजीवाला धार्जिणा नाही. तो त्याच्या नियमांप्रमाणे चालतो, आणि वेगवेगळ्या जीवजाती त्यात आपापली कोंदणे घडवून जगतात. माणसेही बहुतांश काळ अशी निसर्गाच्या सांदीकोपऱ्यांत जगत आलेली आहेत. आपल्याला जे हवे असेल ते घ्यायचे, नको ते टाळायचे, हेच केवळ करता येते; असे मानत माणसे जगत आलेली आहेत. आजची माणसे …