सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर (उत्तरार्थ)

भारतात निर्माण झालेल्या धर्माचे अनुयायी ते सर्व हिंदू, नास्तिक मते बाळगणारेही हिंदू अशा प्रकारची व्याख्या केल्याने व्यवहारातली परिस्थिती बदलत नाही, शीख, बौद्ध, व जैन स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाहीत. व्याख्येनुसार हिंदू असूनही आदिवासींना हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या तथाकथित मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम आवजून राबविला जातोच आहे. प्रा. देशपांडे तर या भेदाभेदांचा हवाला देऊन असेही म्हणतात की, ‘हिंदुराष्ट्र धर्मनिरपेक्ष असणे अपरिहार्य आहे.’ हिंदू सेक्युलरच असतात असे जेव्हा हिंदुत्ववादी नेते म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याला खराखुरा अर्थ असतो.

ते पुढे असेही म्हणतात की रा. स्व. संघ आणि भाजप यांनी हिंदुत्वाची व्याख्या आणखी विकसित करून जास्त उदार केली आहे. उपासना-पंथ-निरपेक्ष हिंदुत्वाची कल्पना त्यांनी केली आहे, असे सांगून ते म्हणतात, ‘ह्या नव्या वाख्येप्रमाणे येथल्या संस्कृतीवर, राष्ट्रपुरुषांवर जे जे प्रेम करतात ते सर्व हिंद. तर खरोखरच व्याख्या विकसित व उदार केली आहे की नाही याची परीक्षा करण्याच्या काही कसोट्या आहेत. संस्कृती, इतिहास, परंपरा राष्ट्रपुरुष प्रतीके यांचे तपशील स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. हे तपशील ठरविण्याचा अधिकार कोणाचा हा मुद्दा तेवढाच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाचा आहे. भारतीय इतिहासातल्या तथाकथित ‘मुसलमानी कालखंडाचे वर्णन कसे केले जाते ही अशीच एक निर्णायक कसोटी ठरेल. तुमचे प्रेम कोणत्या संस्कृती/राष्ट्रपुरुष/परंपरा यांवर असले पाहिजे, कोणता इतिहास तुम्ही खरा म्हणून स्वीकारला पाहिजे हे विश्व हिंदू परिषद वा रा. स्व. संघ वा भाजप ठरविणार. तुमचे प्रेम पुरेसे व मनापासूनचे आहे की नाही हे पण या संस्था/संघटना ठरविणार असल्या तर? आज तरी या बाबतीतला सर्वाधिकार हिंदुत्ववादी स्वतःकडे घेत आहेत असेच चित्र दिसते.

हिंदूची व्याख्या खरोखरीच उदार केली आहे की नाही याच्या पुढील तीन कसोट्या मी सांगेन. (१) विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर गोळा झालेले कर्माचार्य, जगद्गुरु, महंत, पंडित, मुनी आदि मंडळी आपापल्या पंथोपपंथाच्या पातळीवर स्वतःच्या धर्मपीठाचे प्रभुत्व वाढवू इच्छिणारी मंडळी आहेत, धर्म व राजकारण यांची सांगड घालू इच्छिणारी, व अशी सांगड घालून आपली धार्मिक-राजकीय सत्ता वाढवू इच्छिणारी मंडळी आहेत. धर्मपीठे व पुरोहितवर्ग, महंत व धर्ममार्तड यांचा प्रभाव धर्मनिरपेक्षतेच्या आड खऱ्या अनि येतो. मुस्लिम मुल्ला-मौलवींच्या प्रभावाचे व लोकांच्या मानसावरील पकडीचे परिणाम आपणास परिचित आहेत. याच जातकुळींच्या हिंदू मंडळींचा प्रभाव काही वेगळ्या वळणाचा राहणार नाही. ज्यांना हिंदूची व्याख्या उदार बनवावयाची असेल त्यांना या मंडळींना निष्प्रभ करावे लागेल. (२) मुसलमान समाजाला अराष्ट्रीय ठरविण्याच्या, वगळण्याच्या हेतूने सावरकरांनी ‘हिंदूची विशिष्ट व्याख्या केली हे प्रा. देशपांडे यांना मान्य आहे.

मुसलमान समाजाला बरोबरीच्या नात्याने व सन्मानपूर्वक समाविष्ट करणारी नवी व्याख्या स्वीकृत करावी लागेल. अशा व्याख्येला अनुरूप अशी संस्कृती, इतिहास, परंपरा, राष्ट्रपुरुष/प्रतीके यांची मांडणी करावी लागेल. (३) ‘हिंदू’ धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या संदर्भात आजवर उच्चवर्णीय प्रवाह हाच मुख्य प्रवाह मानला गेला आहे व त्याच्याच भूमिकेमधून मांडणी केली जात आली आहे. या मांडणीवर गेल्या दीडपावणेदोनशे वर्षांमध्ये ‘ब्राम्हणेतर’ भूमिकेमधून टीकाटिप्पणी केली गेली आहे. महात्मा जोतिबा फुले यांची मीमांसा आपणास परिचित आहे. या सर्व टीकेची दखल घेऊन उच्चवर्णीय प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी मांडणी करावी लागेल. ‘बाम्हणी/वैदिक हे शब्द वापरावयाचेच झाले तर, अब्राम्हणी/अवैदिक मांडणी प्रतिष्ठित करावी लागेल. ही गोष्ट सोपी नाही. ती करावयाची तर हिंदू समाजाच्या अंतर्गत मोठा वैचारिक संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष करूनच ‘हिंदू’ची व्याख्या खऱ्या अर्थाने विकसित, व्यापक व उदार करता येणार आहे.

सावरकरी व्याख्येनुसार जे अनेक हिंदू धर्म आहेत त्यांचे जे अध्वर्यु- शंकराचार्य म्हणून घेणान्यांपासून ते स्थानिक महंतापर्यंत – आहेत त्यांचे समाजातले वागणे सेक्युलर आढळते? धर्म अनेक आहेत व त्यांच्यात मतमतांतरांचा गलबला आहे, रीतिभाती, मटीप्रधात यांच्यात भिन्नता आहे यावरून हिंदू सेक्युलरच असतात हा निष्कर्ष कसा निघतो ? उलटपक्षी, यांच्यापैकी बहुतेक मंडळी आपल्या अनुयायांना संकुचित विचार, श्रद्धा/अंधश्रद्धा, व्यवहार यांच्या रिंगणात बंदिस्त ठेवतात व त्या आधारे आपले भौतिक हितसंबंध जपतात असे म्हणजे वास्तवाला अधिक धरून होईल.

प्रा. स. ह. देशपांडे यांनी माझ्यासाठी काही प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांच्याकडे आता वळू या
(१) स्वदेशनिष्ठा जरूर आवश्यक आहे. स्वदेशनिष्ठा (किंवा देशप्रेम) आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम यांचा संबंध जरूर आहे. पण तो प्रा. देशपांडे मानतात तसाच आहे का? येथील मुसलमान समाजास जर आपण व्याख्येनुसार अराष्ट्रीय ठरविले, किंवा आम्ही सांगू त्या संस्कृती, इतिहास, परंपरा, राष्ट्रपुरुष/प्रतीके यांच्यावर प्रेम आहे हे आमचे समाधान होत राहील अशा पद्धतीने सतत दाखवीत राहाल तरच आम्ही तुम्हाला राष्ट्रीय म्हणून प्रमाणपत्रे देऊ अशी जर आपण शर्त घातली तर पूर्णपणे एतद्देशीय असूनही आपण या समाजाला खोलवर दुखावून स्वदेशावर प्रेम करण्यापासून परावृत करू. भारतीय संस्कृतीच्या निर्मितीत येथील सर्व एतद्देशीय (व एतद्देशीय नसलेल्याही ब्रिटिशांचा) वाटा राहीलच, आणि कोणाची ती ‘पुण्यभू आहे व कोणाची नाही याचा स्वदेशप्रेमाचा आवश्यक संबंध नाही, ही भूमिका स्वदेशनिष्ठेच्या दृष्टीस उपकारक ठरेल.

या ठिकाणी आणखी एक स्पष्टता जरूरीची आहे. महात्मा फुले येथील गौरवशाली मानल्या जाणाऱ्या संस्कृती वर प्रेम करीत नव्हते, त्यांना तिच्यासंबंधी फार आक्षेप होते. पण म्हणून त्यांची स्वदेशनिष्ठा कमी होती, की त्यांची स्वदेशनिष्ठा अधिक सच्ची होती असे म्हणणे योग्य होईल? मुद्दा असा की, संस्कृती, धर्म, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व गोष्टींसंबंधी टीकात्मक भूमिका घेऊन वाद घालणाऱ्या व्यक्ती स्वदेशनिष्ठेत कमी आहेत असे म्हणण्याचे काही कारण नाही.

घुसखोर, देशद्रोही यांची ओळख पटविणे ही वेगळी व स्वतंत्र समस्या आहे. आज परिस्थिती अशी आहे की विघटनाचा धोका भारत ‘पुण्यभू असलेल्या हिंदूंकडूनच जास्त तीन स्वरूपाचा आहे. मुद्दा असा की, घुसखोरीचा व देशद्रोहाचा मुकाबला ‘संस्कृतिप्रेमा’चा मुद्दा मध्ये न आणता करावयाचा असतो.

(२) मला राष्ट्रवादाची गरज वाटते की नाही हा मुद्दा प्रा. देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी विचारप्रणाली एकाच प्रकारची असत नाही. पाश्चात्य धर्तीची राष्ट्रवादी विचारप्रणाली अंगीकारणे घातक आहे, व त्याची गरजही नाही. राष्ट्रसभेत १८८५ ते १९४७ च्या दरम्यान आपल्या कारकीर्दीत जया राष्ट्रवादाची जोपासना केली तो राष्ट्रवाद मी मानतो. हिंदुस्थानात जेवढे म्हणून लहानमोठे श्रमिक, वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक जनसमूह व समाज राहात होते त्या सर्वांना बंधुभाव, समता, सौदार्ह, देवाणघेवाण, विविधतेत एकता – या मूल्यांच्या / सूत्रांच्या आधारे एका विशाल परिवारात एकत्र आणल्याची गोष्ट ह्या राष्ट्रवादात मध्यवर्ती होती. ब्रिटिशही जर जेत्यांची भूमिका सोडून भारतात बरोबरीच्या नात्याने सेवकाच्या भूमिकेतून देशावर प्रेम करतील तर त्यांनाही आमंत्रण होते. ग्राम ते जग यांना सांधणाऱ्या ‘पूर्णात पूर्ण (whole within wholes) अशा रचनेशी संवादी, विधायक व उपकारक असा हा राष्ट्रसंबंधीचा विचार आहे.

या राष्ट्रवादाचा प्रभाव टिकून होता तोपर्यंत स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात स्थैर्य, सलोखा व शांतता यांचा अनुभव येत राहिला. या राष्ट्रवादाचा प्रभाव ओसरून

पाश्चात्य धर्तीच्या राष्ट्रवादी विचार प्रणालीचा अभाव आधुनिकीकरणासोबत जसा वाढत गेला आहे. तसे प्रत्येक राज्य अधूनमधून स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या गोष्टी करीत आहे. जनसमूहही राष्ट्रीय स्वयंनिर्णयाच्या गोष्टी करीत असतात. सावरकरी (वा रा. स्व. संघ/भाजप यांच्या) राष्ट्रवादी भूमिका रोगी पक्केपणाने मारणारा जालीम उपाय ठरण्याची शक्यता अधिक आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी समाजांना तर मानहानीचाच अनुभव येण्याची खात्री देता येते.

(३) मुसलमान प्रश्नाविषयी एकदा स्वच्छपणे व विस्ताराने सांगण्याचे आवाहन प्रा. देशपांडे यांनी केले आहे.
सगळी चिकित्सा आणि सगळी आग केवळ हिंदुत्वजाद्यांवर रोखण्याचा प्रकार मलाही आक्षेपार्ह वाटतो. पाकिस्तानच्या निर्मितीचे राजकारण येथे हिंदुत्ववादी राजकारणाची प्रतिक्रिया म्हणून केले गेले नाही. ते स्वतंत्रपणे केले गेले. या मागचे मानस हमीद दलवाई व नरहर कुरुंदकर यांनी पुरेसे स्पष्ट केले आहे. त्याची दखल न घेता फुटीर जातीयवादाचा प्रश्न समजणार नाही. त्याची उकल तर दूरच राहिली.

पण त्यांनी उघड केलेल्या मानसाची दखल घ्यावयाची म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे शिल्लक राहतेच. अल्पसंख्य – बहुसंख्य या पद्धतीने विचार करणे फलदायी नाही हा बोध व्यायला हवा. लोकशाहीचा यांत्रिकपणे स्वीकार करणे प्रश्नाची गुंतागुंत वाढविणारा ठरला. लोकशाही प्रक्रिया ‘व्होट बँकेच्या, गट्ठा मतांच्या आधारे चालते. जात – जमातीय राजकारणाचा परिपोष करणारी ही प्रक्रिया राजकारणी बुद्धीने मुस्लिम नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही वापरली. चतुराईने व बेरकीपणाने, यांत्रिकपणे लोकशाहीची प्रक्रिया राबविली की अल्पसंख्यक ही एक गंभीर समस्या बनते.. स्वातंत्र्यानंतर पंचेचाळीस वर्षांनी आपल्या लक्षात येते आहे की, केवळ मुसलमानांचा प्रश्न आपणासमोर नाही. सर्व अल्पसंख्यक जनसमूह राज्यसत्तेमध्ये व आर्थिक भरभराटीत आपला रास्त वाटा राखीव पद्धतीने मिळवून घेण्यासाठी नेमके तेच राजकारण खेळत आहेत जे मुसलमानी नेते खेळत आले.

आपणास केवळ संख्येच्या प्रमाणात येथे स्थान मिळेल, आपण या समाजाच्या इतिहासात जडणघडणीत व वाटचालीत जे योगदान केले आहे त्याला किंमत नाही, ही भावना खोलवर जखम करणारी ठरते. ब्राम्हण व तत्सम उच्चवर्णीय समाजाचा उल्लेख जाणीव होती म्हणूनच ‘कोरा चेक स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली नाही. ब्रिटिशांनी सांगत असतात तो अननय नव्हता तर ते सत्यापही आव्हान होते जिनांना याची परेशा भूमिका होती. मुसलमानांना कोरा चेक देण्याची जी गोष्ट हिंदुत्ववादी चढ्या आवाजात यासाठी काही लाख लोकांच्या प्राणांची बाजी लावावी लागली तरी लावू या-ही त्यांची आम्ही करणार नाही. या कारणाने जी किंमत आम्हाला द्यावी लागेल ती आम्ही देऊ, पण एक ना एक दिवस तुमची मने व अंतःकरणे आम्ही जिंकून घेऊच घेऊ, हीच भूमिका योग्य होईल ना ? मुसलमानांचा प्रश्न याच भूमिकेतून सुटेल. त्यासाठी निर्भयता, आत्मविश्वास निधर्मी होत नाही तोवर तो दलित / मागासवर्गीयांना कधीच न्याय देणार नाही, ही भूमिका जशी असमंजस आहे तशीच, मुसलमान म्हटले की तो असाच वागणार कारण धर्मनिरपेक्ष/निधर्मी बनण्यामधून सुटणारा प्रश्न नाही.

‘आपले अंतर्गत सांप्रदायिक, भाषिक, प्रांतीय, जातीय भेद विसरून हिंद एक होण्याच्या मार्गावर असतील तर या घडामोडीने, केवळ हिंदू एक होत आहेत या कारणाने, आहे व ती मी ‘मराठवाडा दैनिकाच्या एका दिवाळी अंकात नोंदविली आहे.

प्रश्न मात्र आहेत. हिंदू एक होत आहेत ते कोणत्या अनि, हेतूने व उद्दिष्टासाठी? हिंदू एक होण्याचा अर्थ कसा लावला जात आहे ? हिंदू एक होण्याची प्रक्रिया कोणती असायला हवी ? मी हिंदू आहे असे मी गौरवाने कधी म्हणू शकतो? अशा हिंदूपणाचा हेतूंनी प्रेरित झालेली आहेत. त्याचे उद्दिष्ट आक्रमक, विस्तारवादी, मुसलमानांना शत्रुस्थानी लेखून त्यांना दाबात ठेवणारे, हिंस्र उपायांविषयी उत्साह असलेले एक
प्रयत्नांना यश आले तर याचे भयावह अनिष्ट परिणाम होतील.

हिंदुत्ववादी मला इष्ट वाटते त्या दिशेने हिंदू समाजाचे अंतर्गत परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रथम हिंदुराष्ट्रवादी राजकारणाचा व त्यासाठी हिंदूसंघटन करण्याचा मनापासून त्याग करावा लागेल. जसे मुसलमानांमध्ये अंतर्गत परिवर्तन इष्ट दिशेने घडवून आणण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रथम आज ज्या पद्धतीने व हेतंसाठी सर्व मुसलमानाना एकत्र केले जात आहे ती पद्धत, हेतू व त्यामागील उद्दिष्ट यांचा त्याग करावा.

नुकताच मी बिहारमधील भागलपूर भागात जाऊन आलो. हिंदुसंघटनांच्या प्रयत्नांमधून झालेल्या दालींच्या परिणामस्वरूप तेथील ग्रामीण मुसलमान समाज अधिक कडवा, फुटीर व मुजोर पण बनत आहे. कारण हाच संरक्षणाचा व वीराला शोभेल असा प्रतिवाद करण्याचा मार्ग आहे असे या सामान्य मुसलमानांना त्यांच्या धार्मिक-राजकीय संघटना पढ़वीत आहेत. विश्व हिंदू परिषद हिंदूंना संघटित व मुजोर बनवीत आहे.

ट्रेड ऑफ्सचा मुद्दा मला कळतो. व धन वाळा निघाला तर प्रसंगी ‘उरले ते गंगाजळ’ असे म्हणण्याची माझी तयारी आहे. उदाहरणार्थ, दारू पिऊन गावात गोंधळ घालायचा नाही हा निर्णय धाब्यावर बसवून दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना राळेगण शिंदी गावी श्री. अण्णासाहेब हजारे मंदिरासमोरील खांबाला बांधून हंटरने मार देत. इथे ‘उरले ते गंगाजळे ही भूमिका घेता येते. पण माझी अडचण अशी की (१) मला धन बर्ताळा निघताना अनुभवाला येत नाही; (२) इष्ट परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य आणि अनिष्ट द्वेषपूर्ण कृती या वेगळ्या वेळी व ठिकाणी घडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे उरले ते गंगाजळ म्हणण्याची सोय नाही, आणि (३) उरले ते गंगाजळ म्हणत असताना आपण हे कबूल करतो की या गोष्टी न घडत्या, कराव्या लागत्या तर बरे होते. या अभद्र घातक गोष्टी आहेत यावर एकमत असते. पण हिंदू संघटनेच्या संबंधात, हे प्रयत्न करणारे हेतुतःच या गोष्टी घडवून आणीत आहेत व त्यांचा अभिमान बाळगतात.

समारोप करण्याच्या आधी शेवटी ‘अखंड भारताच्या मुद्द्यावर विचार करू.
‘अखंड भारत हे फक्त एका सावरकरांचे वा हिंदुत्वनिष्ठांचे स्वप्न होते असे नाही. ते महात्मा गांधींचेही स्वप्न होते. शब्द तेच असले तरी त्यांचा आशय मात्र फार वेगळा होता. ‘ग्रेटर जर्मनी,’ ‘ग्रेटर जपान, ‘ग्रेटर इंग्लंड’ या संकल्पना आपणास परिचित आहेत. या संकल्पनांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्याशी संलान राष्ट्रवादाच्या नाण्याची दुसरी बाजू साम्राज्यवाद ही असते. सावरकर वा अन्य हिंदुत्ववादी यांचा अखंड भारतात, अंतिमतः ब्रम्हदेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान यांचा (कल्पनेत तरी) समावेश असतो वा ते विचारांचे वळण असते. प्रभावक्षेत्र तर आग्नेय आशियावर पसरलेले राहू शकते, कारण कधी काळी हिंदू धर्म व संस्कृतीचा प्रभाव या सर्व क्षेत्रावर होता. अनेक विभिन्न लोकसमूह या प्रकार च्या अखंड भारतात राहतील. रोजचा कारभार धर्मनिरपेक्षाही राहील. पण ‘हिंद राजकीय-सांस्कृतिक वर्चस्व सर्वांना पायाभूत, अपरिवर्तनीय गृहीत म्हणून स्वीकारावे लागेल. ‘अखंड भारताची ही संकल्पना पाश्चात्य राष्ट्रवादी विचारप्रणालीत चपखल बसणारी आहे.

महात्मा गांधींची ‘अखंड भारताची संकल्पना बृहत् एकत्र कुटुंबाच्या संकल्पनेच्या स्वरूपाची आहे. नामवंत इंग्लिश कादंबरीकार व्ही. एस. नायपॉल यांच्या अलिकडील इंडिया (१९९०) या पुस्तकात त्यांनी एक मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. नायपॉल यांचे पूर्वज एकोणिसाव्या शतकात उत्तर भारतातून कंत्राटी मजूर म्हणून वेस्ट इंडीज बेटांमध्ये गेले. हिंदस्थानातील आलेले आपण सर्व हिंदी लोक अशी पारिवारिक भावना मनात तेथे प्रबळ होती. जाती-जमातींचा विचार गौण होता. नायपॉल यांनी म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनीही हिंदी कुटुंबाची भावना अनुभवली. जात-जमात, धर्म, आर्थिक स्थिती या सगळ्यांच्या पलीकडे ‘हिंदी ही अस्मिता निकटची व प्रबळ होती. जात-जमात, धर्म, आर्थिक वर्ग यांनापोटात सामावून घेणारी विशाल व उन्नत हिंदी अस्मिता, स्वदेशनिष्ठा यांच्या आधारे अखंड भारताचे स्वप्न गांधींनी पाहिले म्हणूनच ब्रिटिशांनाही या हिंदी कुटुंबात घेण्यास त्यांना अडचण वाटली नाही.

हिंदुत्ववादी देशाच्या अखंडत्वाचे निष्ठावान पुरस्कर्ते आहेत या प्रा. देशपांडे यांच्या विधानाचा परामर्श अखंड भारताच्या या दोन विरुद्ध टोकाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवन घेऊ. मी असे सुचवतो की लीगी मनोवृत्तीचे मस्लिम नेतेही ‘अखंड भारताचे निष्ठावान पुरस्कर्ते आहेत असे म्हणता येईल. फरक एवढाच की त्यांच्या कल्पनेतील ‘अखंड भारतावर मुस्लिम जमातीचे राजकीय सांस्कृतिक वर्चस्व त्यौना अभिप्रेत आहे. संकल्पनेची जातकुळी एकच आहे. वर्चस्व स्वीकारले तर तेही आज धर्म लादू इच्छित नाहीत. उलट हिंदूंनी हिंदू राहणे त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. निष्ठावान असण्याबद्दल मतभेद नाही. मुद्दा असा की ‘अखंड भारताची हिंदत्ववादी व मुस्लिम लीगी संकल्पना सारखीच व तेवढीच विघातक परिणाम करणारी आहे. भारत अखंड कधीही बन नये अशी पक्की व्यवस्था करणारी ही संकल्पना आहे.

भारत, पाकिस्तान, बांगला देश (आणि कदाचित श्रीलंका) ही स्वतंत्र राष्ट्र-राज्ये म्हणून अस्तित्वात राहूनही आपणा सर्वांचा स्वदेश तोच एक आहे व इतिहासही सामाईक (शेअर्ड) आहे हे जाणून भविष्यात जर पुन्हा खोलवर व उच्चतर, दोन्ही अर्थीनी, एकात्म व्हावयाची असतील, तर ती हिंदू व मुस्लिम वर्चस्वाच्या भूमिकेमधून एकात्म होणार नाहीत हे नक्की. गांधीप्रणीत अखंड भारताची संकल्पना आकाराला घ्यावी लागेल.

सावरकरांचे लेखन निर्मळ मनाने व आदरपूर्वक अभ्यासावे या प्रा. देशपांडे यांच्या मताशी मी सहमत आहे, जरूर तेव्हा व तेवढ्यापुरती ती गोष्ट मी केली आहे.

हीच गोष्ट खुद प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखनासंबंधी खरी आहे. त्यांनी निर्देश केलेला मौज दिवाळी अंकातील (१९८२) लेख मी त्याच वेळी वाचलेला आहे. तसाच १९९१ च्या मौज दिवाळी अंकातील लेख पण. प्रा. शेषराव मोरे यांचा ग्रंथ मी अभ्यासलेला नाही. पण त्यांच्याशी माझी बरीच विस्ताराने चर्चा झाली आहे.

प्रा. स. ह. देशपांडे यांना मी असे विचारावे का की मस्लिम प्रश्नासंबंधी मी वेळोवेळी केलेले लेखन त्यांनी वाचले आहे का ? राष्ट्रवादावरही मी लेखन केलेले आहे. मुस्लिम प्रश्नासंबंधीचे महात्मा गांधींचे लेखन त्यांनी बारकाव्यासह अभ्यासले आहे का? मौज १९९१ दिवाळी अंकातील लेख वाचल्यावर मला असे जाणवले की त्यांनी गांधींचे लेखन पुरेशा बारकाईने वाचलेले नसावे व डॉ. आंबेडकरांचे लेखनही संदर्भ ध्यानात ठेवून, चिकित्सक दृष्टीने परीक्षा करून घेतले नसावे. पॅनइस्लामिझम, मुस्लिम प्रश्न, गांधींची भूमिका यावर श्री. बलराम नंदा यांचेही एक अभ्यासपूर्ण पुस्तक अलीक. प्रसिद्ध झाले आहे.

माझे प्रा. देशपांडे यांच्याशी काही मुद्द्यांवरून तीव्र मतभेद असले तरी, ज्यांच्याशी अटीतटीची पण निकोप वैचारिक चर्चा करावी अशा मित्रांमध्ये मी त्यांचा समावेश करतो. त्यांचे लेखन नेहमीच अभ्यासपूर्ण, नेटके व विचारांना चालना देणारे असते व म्हणून शक्यतो ते चाचण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांचे अमुक एक लेखन वाचावे अशी कोणतीही शिफारस मी कधीच औचित्यहीन मानणार नाही. असो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.