मासिक संग्रह: ऑक्टोबर , १९९२

पत्रव्यवहार

श्री. संपादक आजचा सुधारक
स. न. वि. वि.
श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसर्याअ अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे युक्तिवाद उद्धृत केले आहेत ते लक्षात घेतलेच पाहिजेत यात शंका नाही. ते ध्यानात घेऊन मी माझी मांडणी सुधारून घेऊन असे जरूर म्हणेन की, सावरकरांच्या सुधारणाकार्याची प्रेरणा संमिश्र व गुंतागुंतीची होती.

पुढे वाचा

कालचे सुधारक- आधुनिक कामशास्त्राचे प्रणेते : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग २)

खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार म्हणून आहिताग्नी राजवाडे उभे राहिले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘ धिमाधवविलासचंपू’ मध्ये पूर्वी अविवाहित स्त्रियांना मुले होत असे विधान केले खरे, परंतु ते त्यांचे एक तऱ्हेवाईक मत आहे अशी मखलाशी आहिताग्नींनी केली. कर्व्यांच्या बाजूने रियासतकार सरदेसायांची साक्ष झाली. आक्षिप्त लेख शास्त्रीय दृष्टीने लिहिला आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयाने मात्र तो मानला नाही. कर्व्यांना दोषी ठरवून १०० रु. दंड केला. ही घटना एप्रिल १९३२ मधली.. या निकालासंबंधी दोन शब्द या लेखात कर्वे म्हणतात, ‘आमचे चुकीमुळे शिक्षा झाली नसून मॅजिस्ट्रेटला आमची मते पसंत नसल्यामुळे झाली.

पुढे वाचा

डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीति विचारावरील आक्षेप

डॉ. जोशांचा पहिला आक्षेप असा आहे की कांट काय किंवा उपयोगितावादी काय, त्यांचे विवेचन प्रमाणविरुद्ध आहे. कारण विवेकवाद्याला उपलब्ध असलेल्या दोन प्रमाणांनी त्यांचे समर्थन अशक्य आहे. उदा. साधु ईहेचे स्वरूप काय आहे?ती ‘साधु’ कशी ठरते?‘साधुत्व म्हणजे काय?या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दुर्लभ आहेत असे ते म्हणतात. ते असे का म्हणतात कळत नाही, कारण या प्रश्नांची समर्पक उत्तरे कांटने दिली आहेत, आणि त्यांचा उल्लेख माझ्या लेखात मी केला होता. असे असले तरी ती उत्तरे मी पुन्हा देतो.
ईहा म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी असणारी अशी मानस शक्ती की जिच्यामुळे तो स्वतंत्रपणे कर्मे करतो.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. प्रदीप पाटील यांना उत्तर (उत्तरार्ध)

धर्मसुधारणा कशास म्हणावयाचे याची स्पष्टता करावी लागेल. तसेच हिंदुधर्माभिमानी’ या शब्दाची. एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात सनातनी ब्राम्हणांचा एक पक्ष अस्तित्वात होता. यांच्यासाठीच हा शब्द वापरावयाचा का? तसेच हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, चळवळी यातील व्यक्तींसाठी हाशब्द राखून ठेवायचा का? अशी व्याख्या केली तर न्यायमूर्ति रानडे, संत गाडगे महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, इत्यादि कोणीच हिंदुधर्माभिमानी ठरत नाही.
मी माझ्या लेखनात या शब्दांचा प्रयोग केलेला नव्हता. ‘हिंदू असल्याबद्दल रास्त अभिमान बाळगणार्या व धर्माविषयी, परंपरा व इतिहास यांविषयी आस्था बाळगणाच्या अशा अर्थाचे वाक्य मुळात आहे’.

पुढे वाचा

विवाह आणि नीती- आमची भूमिका

Morals या जगप्रसिद्ध ग्रंथाचा अनुवाद सादर केला. त्याचा हेतू विवाह, कुटुंबसंस्था आणि नीती या अतिशय महत्त्वाच्या विषयावरील एका थोर विचारवंताचे विचार वाचकांना कळावे व त्यांच्या विचारांना चालना मिळावी. रसेल यांची सर्वच मते सर्वांना पटतील अशी अर्थातच आमची अपेक्षा नव्हती. परंतु मनुष्यसमाजाविषयी ज्यांनी खोल विचार केला आहे आणि तो विचार सुबोध आणि स्वच्छ शैलीत वाचकांपुढे मांडला आहे. अशा समाजचिंतकाच्या विचारापासून आमचे वाचक वंचित राहू नयेत एवढाच हेतू त्यामागे होता. तो अनुवाद आता संपला आहे. त्या ग्रंथातील विचारांविषयी आमचे मत काय आहे हा प्रश्न वाचकांच्या मनात अनेकदा उद्भवला असणार, आणि खरे म्हणजे तो अनेकवार विचारलाही गेला आहे.

पुढे वाचा

महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र

अशा मनुष्याच्या लेखात कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजे. हा वेडा पीर इतके हाल, संकटे व लोकापवाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकांस अंती हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री असावी असा विचार लोकांच्या मनात येऊन त्यांनी त्याच्या दोषाबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. लोकांनी तसे केले तर ठीकच आहे. पण नाही केले तरी त्यास (या लेखकास) विशेषसे वाईट वाटण्याचा संभव नाही; कारण सारे जग त्यावर उलटले तरी प्रसिद्ध संस्कृत कवीच्या विचाराप्रमाणे तो म्हणेल, की खरोखरीच जे या गोष्टीत आमची निर्भर्त्सना करतात त्यांना काहीच समजत नाही व त्यांच्याकरिता हा आमचा प्रयत्नही नाही.

पुढे वाचा