मासिक संग्रह: डिसेंबर, 2001

शिक्षण — रंगीकरण

बहुतांश भारतीय भारतातल्या औपचारिक शिक्षणव्यवस्थेवर नाराज असतात, हे निर्विवाद आहे. सामान्यपणे आपल्या आसपासची किंवा आपली स्वतःची मुले शिकत असताना आपण आपली नाराजी तपशिलात व्यक्त करतो. एकेका वर्गात प्रचंड संख्येने कोंबलेली मुले, शंकास्पद तज्ज्ञतेचे शिक्षक, खर्च, शिकवणी वर्ग, परीक्षा-गैरप्रकार, आपण सुचतील तेवढे दोष आणि जाणवतील तेवढ्या त्रुटींचा जप करत राहतो. पण साधारण नागरिक त्यांच्या ओळखीतली, नात्यातली मुले शिक्षण संपवती झाली की शिक्षणाबद्दल ‘बोलणे’ थांबवतात. काही ‘पेशेवर’ शिक्षणतज्ज्ञ शिक्षणावर सातत्याने चर्चा करत राहतात, आणि अशा चर्चा खूपशा विरळ वातावरणातच बंदिस्त होतात. मग त्यात भाग घेणारे आपापले ‘लाडके’ मुद्दे पुन्हापुन्हा मांडत राहतात आणि कोणी बाहेरचा या चर्चांमध्ये डोकावलाच तर त्याला चित्र दिसते ते दळलेलेच पीठ पुन्हा दळण्याचे.

पुढे वाचा

गर्व से कहो- हम इन्सान हैं!

“तुम्ही स्वतःला दोन गटांमध्ये विभागून घ्या. एकात मुस्लिम, दुसऱ्यात हिंदू, म्हणजे आपापल्या मृतांची तुम्हाला काळजी घेता येईल”, भोपाळचे आयुक्त रणजित सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. हे विद्यार्थी गॅस दुर्घटनेनंतर मदत करायला आले होते.
आयुक्तांच्या सूचनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटली. एका विद्यार्थ्याने विचारले, “अशा वेळी हिंदू आणि मुसलमानांत काही फरक असतो का?” दुसरा म्हणाला, “हे घडू देणारा देव तरी असतो का?” आयुक्त नंतर म्हणाले, “मी एकाएकी खूप क्षुद्र झालो. मला त्यांचे कोणत्या भाषेत आभार मानावे हेच कळेना.”
[डॉमिनिक लापिएर आणि जेवियर मोरो यांच्या “इट वॉज फाईव्ह मिनिट्स पास्ट मिडनाईट इन भोपाल” (फुल सर्कल, २००१) या पुस्तकातून.]

पुढे वाचा