मासिक संग्रह: डिसेंबर, 2001

पत्रसंवाद

सुधाकर देशमुख, कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर–४१३५१७
सध्या इंग्रजी वाङ्मयामध्ये J. K. Rowlings ह्यांच्या पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा नायक Harry Potter हा पा िचमेत आणि भारतातही (अर्थात इंग्रजीवाचकांत) लोकप्रिय होत आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या याद्यांत ह्या पुस्तकाची आघाडी गेली कित्येक महिने कायम आहे. Times of India सारख्या मान्यवर वृत्तपत्राच्या संपादकीयातही Harry Potter Phenomenon संबंधी लिहिले गेले आहे. जादूटोण्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्यांचे लेखन आहे. ह्या पुस्तकांच्या वाचनानंतर माझ्या मनात दोन प्र न निर्माण झाले. पहिला असा की जादूटोण्यासारख्या अशास्त्रीय विषयावर मुलांकरिता लिहिलेले पुस्तक एवढे लोकप्रिय का व्हावे?

पुढे वाचा

विक्रम-वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, ह्या वेळेस मी तुला थोडी अलीकडची गोष्ट सांगणार आहे. अमरावती नावाचे एक राज्य होते. हे राज्य अत्यंत प्रगत राज्य होते. त्या काळच्या राज्यांमध्ये सगळ्यांत प्रगत आणि संपन्न. तेथील प्रजा शिकली-सवरलेली आणि उद्यमशील होती. प्रजेला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते त्यामुळे ह्या देशाचा नागरिक बनण्याची इतर देशांतील लोकांची महत्त्वाकांक्षा असायची. ह्या देशाचे सैन्यदलही बलाढ्य होते आणि इतर कोणत्याही देशाला नामोहरम करण्याची शक्ती त्याच्यात होती.

पुढे वाचा

अर्थनीती, वैचारिका व संतुलितसमाज

श्री. गं. रा. पटवर्धन (आजचा सुधारक, ऑक्टोबर २००१, पृ. २५७-२६०) ह्यांनी ‘अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका’ ह्या लेखात आर्थिक विकासामागील प्रेरणा, वैचारिका (ideologies), सिद्धान्त इत्यादींचा थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यात त्यांना शुंपीटर ह्या अर्थशास्त्रज्ञाचे विचार अधिक सयुक्तिक व वास्तववादी वाटतात असे म्हटले आहे. शुंपीटर ह्यांच्या ‘नवप्रवर्तनातून विकास’च्या मताची मांडणी करताना त्यांनी सुरुवातीला असे प्रतिपादिले आहे की “खुल्या बाजार-पेठांतून व्यवहार सुरळीतपणे चालत असतात’ वगैरे.
पटवर्धनांनी विकासाच्या विचारांचा आढावा अतिशय अभ्यासू पद्धतीने घेतला. परंतु त्यात एकदोन महत्त्वाचे आयाम विसरल्यासारखे झाले असे वाटले म्हणून हे टिपण.

पुढे वाचा

रोजगार आणि पैसा

खादी आणि रोजगार यांच्या संबंधाने आपण मागच्या लेखांकात काही चर्चा केली. या अंकात रोजगार आणि पैशाची उपलब्धता यांचा विचार करावयाचा आहे. पैसा आणि रोजगार यांचे संबंध समजून घेण्यासाठी आधी आपण पैसा म्हणजे काय हे तपासून पाहू.

मला स्वतःला पैसा आणि परमेश्वर यांच्यात अत्यंत साम्य जाणवते. आजचा सुधारक च्या वाचकाला परमेश्वर नाही, पण तो आहे असे गृहीत धरून आपले सारे व्यवहार चालतात हे चांगले ठाऊक आहे. पण पैसा देखील मुळात कोठेही नसून तो आहे इतकेच नव्हे तर देवासारखाच सर्वशक्तिमान आहे असे गृहीत धरून चालल्यामुळे आपले आर्थिक व्यवहार होतात हे माहीत आहे की नाही याविषयी शंका वाटते.

पुढे वाचा

उदारीकरणामुळे शिक्षणातही असमतोल!

गेल्या दशकाच्या प्रारंभापासून देशात सुरू झालेल्या रचनात्मक सुधारणा प्रक्रियेचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर नेमका कोणता परिणाम होईल, याबाबत आजवर विस्तृत वि लेषण झाले आहे. मात्र या ऊहापोहात, या प्रक्रियेचा शैक्षणिक क्षेत्रावर आणि विशेषतः विद्यापीठीय व्यवस्थेवर काय प्रभाव पडेल याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते. कार्यक्रमाचे यश हे प्रामुख्याने तांत्रिक प्रगती, उत्पादकता आणि मनुष्यबळ विकास या तीन घटकांवर अवलंबून असते. या तीनही कारक घटकांच्या संदर्भात विद्यापीठीय व्यवस्थेची भूमिका केंद्रवर्ती स्वरूपाची आहे. असे असूनही या चर्चेतून शिक्षणक्षेत्र आणि विद्यापीठ व्यवस्था वगळली जावी, हा विरोधाभास जाणवणारा आहे.

पुढे वाचा

मध्यरात्रीनंतर पाच मिनिटे

माणसे धान्य पेरतात, पण त्यातून उगवणारी पिके मात्र कीटकांना आणि इतर जीवाणूंनाही आवडतात. अशा किडींपासून पिकांचे रक्षण करणे, हा शेतीच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. वेगवेगळे नैसर्गिक व कृत्रिमरीत्या घडवलेले पदार्थ वापरून माणसे किडींचा नायनाट करू पाहतात. कधी किडी ह्या पदार्थांना ‘पचवू’ लागतात, तर कधी हे पदार्थ माणसांना व त्यांच्या परिसराला हानिकारक असल्याचे लक्षात येते. माणसांना त्रासदायक नसणारी, पण किडींना नष्ट करणारी रसायने घडवण्यात रसायनउद्योगाचा एक मोठा भाग गुंतलेला असतो. यूनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या शास्त्रज्ञांनी १९५४ साली अशी काही रसायने तपासली.

पुढे वाचा

सामाजिक विकृतिविज्ञान

[शिवसेनेचे नेते आनंद दिघे ठाण्याजवळ एका अपघातात जखमी झाले. इस्पितळात उपाय योजना होत असतानाच ते वारले. ह्यात वैद्यांचा हलगर्जीपणा आहे असे मत बनवून शिवसैनिकांनी ते अद्ययावत खाजगी इस्पितळ नष्ट केले. ह्या घटनेबद्दल डॉक्टर जोशी लिहितात . . .]

वैद्यकक्षेत्रातील लोक व इतर विचारवंत यांनी शिवसैनिकांचा फक्त निषेध करणे पुरेसे नाही. सामाजिक विकृती व त्यांवरील उपाय शोधणे व ते अंमलात आणणे हा वैद्यकीय पेशांचा हेतूच असायला हवा.

काही वर्षांपूर्वी आजचा संतप्त भारतीय या मथळ्याच्या एका (मासिकातील) लेखात असे सुचवले होते की सामाजिक राग व असंतोषाचे नियमन करणाऱ्या पारंपारिक ‘सुरक्षा झडपा’ नष्ट होत असल्याने आजचे तणावपूर्ण जीवन हिंसाचाराच्या उद्रेकांपर्यंत जाऊन पोचते.

पुढे वाचा

मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्र नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा.

पुढे वाचा

ख्रिस्ती धर्माचा पराभव?

इंग्लंड आणि वेल्समधील रोमन कॅथलिक चर्चचे एक पुढारी गुरुवारी (६ सप्टेंबर २००१) एका मनमोकळ्या भाषणात म्हणाले की ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्म जवळपास पराभूत झाला आहे.
बुधवारी (५ सप्टेंबर २००१) वेस्टमिन्स्टरचे आर्चबिशप कार्डिनल कॉर्मक मर्फी-ओकॉनर म्हणाले की आता शासनयंत्रणा व जनता यांच्या जीवनावर ख्रिस्ती धर्माचा कोणताही प्रभाव नाही. वाट चुकलेले (lapsed) कॅथलिक अश्रद्ध लोक व तरुण यांच्यापर्यंत ख्रिस्ती धर्म नेण्यास आता क्रांतिकारक पावले टाकायला हवी. टाईम्सच्या वृत्तानुसार कार्डिनल म्हणाले की आता सरकार व जनता यांच्या जीवनांना, सामाजिक व्यवहारांना आणि नैतिक निर्णयांना ख्रिस्ती धर्म पार्श्वभूमी पुरवत नाही.

पुढे वाचा

स्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता?

आजचा सुधारक, ऑक्टो. २००१ मधील श्री. सुभाष आठले यांचा ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनगणनेनुसार समाजात स्त्रियांचे प्रमाण घसरण्याचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्त्रीहत्या आहे हे निर्विवाद. पण त्याची कारणमीमांसा करताना जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर अबोध समाजमनाकडून केवळ जैविक प्रतिसादरूप असा स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप घेतला जात असावा असे जे प्रमेय मांडले आहे ते मुळीच विवेकाला धन नाही. समाजातील स्त्री/पुरुष प्रमाणाचा नैसर्गिक समतोल ढळतो आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीहत्या जैविक पातळीवर नैसर्गिकपणे घडून आली असती, तर हा समतोल बिघडण्याचे कारण नव्हते.

पुढे वाचा