मासिक संग्रह: जानेवारी, 2002

हक्क केवळ मातेचाच

वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते.

पुढे वाचा

अक्कलखाते

यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस ६४ ही योजना चर्चेत आहे. हिच्यात गुंतवणूक होती १४० अब्ज रुपये, आणि आज हिचा तोटा आहे ४५ अब्ज रुपये. काही उद्योगांचे समभाग अवास्तव किमतींना विकत घेतले गेले, व नंतर ते उद्योग अकार्यक्षम (किंवा फसवणूक करणारे) असल्याने तोटा आला, हे आता जगजाहीर झाले आहे.

पुढे वाचा

सांस्कृतिक नेतृत्व?

महाराष्ट्रातील सांस्कृतिक नेतृत्वाने (पत्रकार, विचारवंत, संपादक, लेखक, कवी इत्यादी) या बदलत्या जगाचे, माध्यममाहितीच्या क्रांतीचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, दोलायमान मनःस्थितीचे आणि बहुसांस्कृतिकतेचे आव्हान विचारा तही घेतलेले नाही. आपल्या मानसिकतेच्या भौतिक (जातीय आणि भाषिक) कक्षा रुंदावल्या नाहीत. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि अर्जेटिनापासून ऑस्ट्रेलिया-पर्यंत जे नवे प्रवाह साहित्य-संस्कृतीत येत होते, लोकांचे दैनंदिन जीवन बदलत होते, नवी मूल्ये तयार होती, नाती बदलत होती, त्यांची दखल घेतलेली नाही.
या सर्व जगडव्याळ घटनांचा संस्कार साहित्यातून प्रगट व्हायला ‘साहित्याचे राजकीय जागतिकीकरण’ होण्याची गरज नाही. अगदी कौटुंबिक, सामाजिक कथेतून वा राजकीय कादंबरीतूनही बदलणाऱ्या मानसिकतेचे चित्र रेखाटता येते.

पुढे वाचा