मासिक संग्रह: जुलै, २००३

तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)

नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो.

पुढे वाचा

“धोकादायक पाणी!”

पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्र न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ.

पुढे वाचा