मासिक संग्रह: मे, २००८

सीमांतापासून सीमांतापर्यंत दलित

समकालीन वादविवादांमध्ये उपेक्षित वर्गांच्या (disadvantaged groups) सामाजिक बहिष्कृतीची आणि समाजातील मुख्य प्रवाहाच्या बाहेर असण्याची (marginalisation) चर्चा वारंवार होते. बहिष्करणाच्या ह्या चर्चेने पूर्वी वापरात असलेले शोषण, वर्चस्व आणि दडपणूक हे शब्द मागे टाकले आहेत. बहिष्कृती आणि marginalisation ला प्रतिक्रिया म्हणून वेगळ्या संज्ञा प्रचलित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उदा. अधिकाराचा आग्रह (entitlement), सबलीकरण (empowerment) आणि सामाजिक समावेशन (Social inclusion). काही वेळा ह्या शब्दांच्या ऐवजी marginlisation हा शब्द अनेक विद्वान वापरतात. Marginalisation च्या इतक्या विविध संदर्भात केलेला वापर पाहता त्या शब्दाची व्याख्या करण्याची आवश्यकता आहे.

पुढे वाचा

ओबीसी आणि आरक्षण

मार्क गॅलेंटर यांनी आपल्या ‘Who are the Other Backward Classes?’ या लेखात भारतीय परिस्थितीत मागासवर्गीय या संकल्पनेचे दहा विविध अर्थ मांडले आहेत. यात अस्पृश्य जाती ते जातिविरहित चाचण्या पूर्ण करणाऱ्या सर्व व्यक्ती अशांचा समावेश होतो.
भारतीय संविधानातील ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले – (Socially and Educationally Backwards SEBC) म्हणजेच इतर मागासवर्गीय (Other Backward Classes OBC) होत. देशपातळीवरील व राज्यपातळीवरील विविध आयोग आणि समित्या यांतून या समाजघटकाच्या निश्चितीसाठी विविध निकष लावले गेले. या सर्वांचा शेवट मंडल आयोगापर्यंत आलेला दिसतो. (त्यानंतरही राष्ट्रीय पातळीवरील मागासवर्गीय कमिशन, राज्य मागासवर्ग कमिशन यांचेही प्रयत्न चालू राहिले); तथापि मंडल आयोग हा ओबीसींच्या राष्ट्रीय पातळीवरील निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

पुढे वाचा