मासिक संग्रह: मार्च, २०११

पुस्तक-परिचय : विदर्भ राज्य संकल्पना

‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हे शब्द पश्चिम महाराष्ट्रात उच्चारले गेले, तर प्रतिसाद कपाळावर आठ्यांचा तरी असतो, किंवा तुच्छतेने हसण्याचा तरी हे प्रतिसाद बहुतेककरून प्रश्नाच्या अपुऱ्या आकलनातून येतात. मुळात विदर्भ राज्य ही संकल्पना कोणत्या आधारावर मांडली जाते, हे स्पष्ट करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी नरेंद्र लांजेवारांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत विदर्भ राज्य संकल्पना नावाच्या पुस्तिकेतून प्रकाशित केली गेली (विसा बुक्स, veesabooks@gmail.com, रु.50/-).

सुरुवातीला एका प्रस्तावनेतून लेखकद्वय विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची तोंडओळख करून देतात. हे आवश्यक आहे, कारण “महाराष्ट्रालाच इतिहास आहे तर इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे” असे गर्वाने सांगणाऱ्यांनाही बहुधा शिवाजीच्या आधीचा इतिहास सुचलेला नसतो.

पुढे वाचा

घराणी, चोरी, स्वातंत्र्य

पु.ल.: तुमचं घराणं या विषयावर काय मत आहे? भीमसेन : माझं स्वतःचं काय आहे, की मी डेमॉक्रॉटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आईवडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढं ठेवलं तर ती पोपटपंची होते. मग आपलं काही तरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे

. पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य वाटतं की, तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत तुम्ही जी रचना केलीत, त्याच्यामध्ये नवीनपण आहे.

पुढे वाचा

सँडेल व्याख्यानांची चिकित्सा – भाग दोन

सामाजिक संकेत हीच ‘सारतत्त्वे’? आणि जनुकासुर मातू नये म्हणून

एखाद्या गोष्टीचे सारतत्त्व म्हणजे काय? हे सांगण्यासाठी सँडेल यांनी दिलेले बासऱ्यांचे वाटप करण्याचे उदाहरण पूर्णतः फसलेले आहे. सँडेल सांगतात की, चांगल्या बासऱ्या उत्तम बासरी वादकांना मिळाव्यात कारण ते चांगले संगीत निर्माण करू शकतील, असे आपण सामान्य माणसे म्हणू, “पण अरिस्टॉटलचे उत्तर वेगळे आहे.” (6/238) चांगले वाजवले जाणे हेच बासऱ्यांचे, (संगीतसभांचेही) प्रयोजन आहे म्हणून चांगल्या बासऱ्या चांगल्या वादकांना मिळायला हव्यात. आता ह्यात पॅसिव्ह व्हाईस सोडून वेगळे काय आहे? जे बोलून चालून इन्स्ट्रूमेंटच आहे त्याचे सार तत्त्वही इन्स्ट्रुमेंटलच असणार!

पुढे वाचा

अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग ४)

[श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापासून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) हे विभाग दिले होते. दुसऱ्या भागात 54 कडव्यांमधून (13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण (14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका (15) शंकेचे निरसन (16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण (17) शब्दप्रमाणपरीक्षा (18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा (19) काही अंधश्रद्धा हे विभाग दिले होते.

पुढे वाचा

विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर

28 नोव्हेंबर 2010 रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना ‘विकीलीक्स’च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज याने 2006 पासून विकीलीक्समार्फत विविध प्रकारची गोपनीय माहिती उघड केलेली आहे. पाश्चात्त्य देशांनी, विशेषतः अमेरिकेने त्याची वेळोवेळी दखलही घेतलेली आहे. आताच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा एक फरक मात्र दिसतो आहे : असांजला गौप्यस्फोट करता येऊ नये यासाठी अनेकांनी आता कंबर कसलेली आहे. असांजला आणि त्याच्या विकीलीक्सला जगभरात मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांना संपवण्याचे होणारे प्रयत्न, यांमुळे या सर्व प्रकाराविषयी विविध मते आणि विचार मांडण्याची अहमहमिका लागलेली आज सर्वत्र दिसते आहे.

पुढे वाचा