गडबड-घोटाळे (व्यंगचित्रे)

चित्रकार प्रभाकर पाचपुते ह्यांच्या खालील चित्रांना आधार आहे तो माध्यमांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा. प्रसार व प्रचारमाध्यमे ज्या पद्धतीने लोकांच्या मनात अवाजवी भीती पसरवत आहे, त्याचे हे बोलके चित्रण आहे.

दोन दशकांपूर्वी Y2K Bug मुळे (वर्ष २००० मुळे संगणकीय व्यवहारांत आलेला अडथळा) लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती पसरवण्याचे काम तेव्हाच्या प्रसार आणि प्रचारमाध्यमांनी केले. ३१ डिसेंबर १९९९ च्या मध्यरात्रीपासून संपूर्ण विश्वातील संगणक प्रणाली ढेपाळल्याने आर्थिक जगतात काय हाहाकार माजू शकतो – जणू जगबुडी होऊ घातली आहे – हे मांडून सामान्य लोकांत असमंजस्य निर्माण करण्यात माध्यमांची असलेली भूमिका ह्या चित्रांतून स्पष्ट होते.

Manager on move with its Surveillance (पाळतीवर जाणारा माध्यम-व्यवस्थापक)

बॅंकांमधील दैनंदिन व्यवहारांना खीळ बसून लोकांच्या पैशांच्या व्यवहारांवर मर्यादा येतील असे वातावरण त्यावेळी निर्माण झाले होते. ह्या आर्थिक आरिष्टाचे परिणाम भयंकर असणार आहेत याबद्दल सामान्य लोकांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. 

Glitches of yesterday -I
Glitches of yesterday -II

जगबुडीची ही अवास्तव कल्पना पाश्चात्त्य देशांतून आपल्याकडे आली ह्याकडे लक्ष वेधत असतानाच प्रसिद्ध कवी हेमंत दिवाटे ह्यांच्या २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चौतिशीपर्यंतच्या कविता’ ह्या काव्यसंग्रहाचा संदर्भ चित्रकाराने दिला आहे. ह्या काव्यसंग्रहात एका कुटुंबाच्या मानसिकतेचे वर्णन आहे, जे कुटुंब ‘जग आता संपणार’ ह्या काल्पनिक वास्तवाच्या भयाने आपले सारे संचित, वाचवून ठेवलेले सगळे पैसे सढळ हाताने खर्च करून भव्य भोजनसमारंभाचा आस्वाद घेते… आणि पुढच्या दिवशी सकाळी उठून पाहाते, तो जगरहाटीत काहीही फरक पडलेला नाही! सारे कसे पूर्वीसारखेच सुरळीत चाललेले!

माध्यमांच्या कल्लोळात सामान्य जनतेच्या होणाऱ्या दयनीय अवस्थेचं हे प्रगटीकरण.

Glitches of yesterday -III

Mixed media (Woodcut, drawing on paper and wall)

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.