मासिक संग्रह: जानेवारी, 2026

पुस्तक परिचय – अप अगेन्स्ट डार्कनेस

मूळ लेखिका – मेधा देशमुख भास्करन
भाषांतर – फिटे अंधाराचे जाळे – सुनंदा सदाशिव अमरापूरकर 

वेश्यांबद्दल सामान्य माणसाच्या भावना संमिश्र असतात. कुतूहल, घृणा आणि करुणा असे एक रसायन त्याच्या मनात असते. घरांमध्ये वेश्यांचा विषय काढला जात नाही. बायका वेश्यांबद्दल बोलणे टाळतात, पुरुष बोलले तर त्यांचा उल्लेख “रांडा” असे तुच्छतादर्शक करतात. पण एखादा माणूस कुतूहल आणि घृणेच्या पार पलीकडे जातो आणि अथांग करुणेने वेश्यांच्या प्रश्नाला भिडतो. त्याच्या जिद्दीने, परिश्रमाने आणि धैर्याने अनेकजण त्याच्या कार्यात सहभागी होतात आणि तो संस्था उभारून आपल्या कार्याला स्थायी रूप आणतो.

पुढे वाचा

पुस्तक परिचय – मढवून ठेवलेल्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारे शरणकुमारांचे ‘अक्करमाशी’

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव : अक्करमाशी
लेखक : शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक : दिलिपराज प्रकाशन

आपल्याकडील समाजव्यवस्थेत, कुटुंबव्यवस्थेत सोज्वळतेचे रूप दिसते. ह्या व्यवस्थांमधील परंपरांच्या कप्प्यांमध्ये माणूस जगत असतो. वरून दिसणारी सोज्वळता आतून कितीही पोखरलेली असली, तरी ती दुर्लक्षून दिखाऊपणाचे तेज कायम टिकवून ठेवले जाते. ही नटवी व्यवस्था खिळखिळी कशी झालेली असते ते ‘अक्करमाशी’ ह्या आपल्या आत्मकथनात शरणकुमार लिंबाळेंनी दाखवून दिले आहे. समाजाने ठरविलेल्या नैतिक-अनैतिकतेच्या, शुद्ध-अशुद्धतेच्या मोजपट्ट्या मानवी जीवनात कशा नकली ठरतात हे दाखवून देऊन केवळ माणूस शिल्लक राहतो हे ‘अक्करमाशी’त आपणास पाहायला मिळते.

पुढे वाचा

खरंच भारतात नक्षलवाद हा फार मोठा धोका आहे का?

संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाच्या सुमारे १०% लोकसंख्या असलेल्या, १५%, दलित, ५०% महिला आणि १५% अल्पसंख्याक मिळून ९०% समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच्या गेल्या ५५ वर्षांच्या सामाजिक जीवनात विविध अनुभव गोळा झाले आहेत. त्या अनुभवांच्या आधारे केलेल्या अभ्यासाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. आपल्या देशात सुरू असलेल्या आदिवासी असंतोषाकडे भारतसरकारने केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे बरोबर होणार नाही. ह्या असंतोषाच्या परिस्थितीचा मुळापासून अभ्यास करणे, हाच ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी योग्य उपाय होऊ शकतो. 

भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास
भारतात कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत स्थापना कानपूर येथे काही कम्युनिस्टांनी डिसेंबर १९२५ मध्ये केली असून सांप्रत वर्ष कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादातील प्रामाण्याचे निकष

नवभारत मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ च्या अंकात प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत अंकासाठी ह्या लेखावरील प्रतिवाद आला तेव्हा, मूळ लेखही सोबतच पुनर्प्रकाशित करावा असे वाटले. असे केल्याने वाचकांची मूळ विचारांशी ओळख होईल आणि ह्या प्रतिवादातील संदर्भदेखील लक्षात येतील.


सर्वप्रथम rationalism ह्या शब्दाने ज्या दोन उपपत्ती संबोधल्या जातात त्याबद्दल लिहिणे इथे संयुक्तिक ठरेल. मनुष्याला इंद्रियांद्वारे झालेले अनुभव फसवे असू शकतात. रात्रीच्यावेळी अंधुक प्रकाशात एखादी दोरीदेखील साप वाटू शकते. अशावेळी इंद्रियांद्वारे होणाऱ्या अनुभवाने तयार झालेल्या ज्ञानावर शंका उपस्थित करणे उचित ठरते.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवाद

बुद्धिप्रामाण्यवादाचा आवेशाने प्रचार करण्याची उत्कट आवश्यकता अनेकांना जी भासते, तिचे कारण काय? अनेकजण बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे असे मानताना आढळतात. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तरी काय?

बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, “आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये; अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.”

पुढे वाचा

ब्राइट्स सोसायटीतर्फे आयोजित नास्तिक परिषद – २०२५

सेवाग्राम, वर्धा येथे १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ब्राइट्स सोसायटीने नास्तिक परिषद आयोजित केली होती. ह्या तीन दिवसीय निवासी परिषदेत देशभरातून सुमारे ३०० जण सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींच्या प्रतिक्रिया प्रकाशित करीत आहोत 

ब्राइट्स सोसायटीविषयी

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाज व बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी, तसेच कला, विज्ञान–तंत्रज्ञान, उद्योग, समाजसेवा, राजकारण, आदि विविध क्षेत्रांतील नास्तिकांचे योगदान गौरविण्यासाठी ब्राइट्स सोसायटी २०१४ पासून प्रयत्नरत आहे. ब्राइट्स सोसायटीने नास्तिक्य विषयावर चित्रस्पर्धा व चित्रप्रदर्शनी भरवली, तसेच बुद्धिप्रामाण्य, तर्कशीलता ह्या विषयांवरील तीन पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.

पुढे वाचा

कला, संस्कृती आणि एआयचे डिजिटल भावविश्व

अतार्किक बोलण्यातून किंवा कृतीतून विनोद निर्माण होत असतो. असंबद्ध बोलणे, कृती करणे, हे विनोदनिर्मितीतील प्रमुख तंत्र आहे. आपण दररोजच्या धकाधकीच्या धबडग्यात विनोद निर्माण करून थोडा विसावा शोधत असतो. व्यक्तीला कामाच्या ताणतणावात तेवढाच विरंगुळा आणि त्यातून आनंद मिळत असतो. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी आनंदनिर्मिती मनाला स्वस्थता आणि शांतता मिळवून देते. ह्याच आनंदाचा, सुखाचा निरंतर शोध पुढे नकळत काही गोष्टी घडवून आणत असतो. आनंद ह्याचा अर्थ नेहमी काहीही विचार न करणे, दु:ख विसरणे होय. दु:ख अगदी समोर दिसत असतानाही आनंद घेण्याच्या प्रक्रियेत, त्याचा विसर पडू लागतो.

पुढे वाचा

आकांक्षांपुढती इथे शिक्षण ठेंगणे?

युवकांच्या आकांक्षा आणि व्यावसायिक कौशल्यप्रशिक्षण ह्यांमधील तफावत
भारत हा युवकांचा देश आहे, हे विधान गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी, अनेक संदर्भात ऐकायला मिळत आहे. ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ म्हणजे अशी परिस्थिती जिथे काम करू शकणाऱ्या वयोगटातील लोकांची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होण्याची शक्यता निर्माण होते. सध्या भारताच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ह्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा देशाच्या विकासासाठी उपयोग व्हावा ह्या दृष्टीने युवकांच्या कौशल्यविकासासाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० मध्ये इयत्ता सहावीपासून ‘दप्तराविना शाळा’ (बॅगलेस डे) ह्यासारख्या उपक्रमांतून शालेय स्तरावरच विविध व्यावसायिक क्षेत्रांची ओळख करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

पुढे वाचा