विषय «आवाहन»

आवाहन

स्नेह.

१ एप्रिलला ‘सुधारक’चा पुढील अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकासाठी विषयाचे बंधन नसून आपल्याला जवळचा वाटणारा कोणताही संवेदनशील विषय आपण घेऊ शकता. ‘सुधारक’ कथा, कविता, ललित, विनोदी, विडंबनात्मक, निबंधात्मक, परीक्षणात्मक अशा कुठल्याही स्वरुपातील लिखाणाचे स्वागत करते.

– सद्यःस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास नागरिकत्व संशोधन कायद्याविषयीच्या समज-गैरसमजांवर तथ्यात्मक, विश्लेषणात्मक असे काही आपण घेऊ शकतो.
– करोनाच्या विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या/ होत असल्या भयावह स्थितीविषयी काही तथ्ये व काही उपाययोजना यांवरही काही वैज्ञानिक माहिती यावी असे वाटते.
– ‘महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानतेविषयी विचार करताना ‘थप्पड’ सारखा एखादा चित्रपट किंवा ‘देवी’ सारखा नेटफ्लिक्सवरील लघुचित्रपट डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो.

पुढे वाचा

‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी जाहीर निवेदन

गेली २७ वर्षे ‘आजचा सुधारक’ने विवेकवादाशी असणारी आपली निष्ठा अढळ राखत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमण केले. आर्थिक, व्यवस्थापकीय व कायदेशीर अडचणी अनेकदा आल्या. सत्तावीस वर्षांनीही आजचा सुधारकचे स्वतःचे कार्यालय नाही, पगारी कर्मचारी नाही. आम्ही आमच्या लेखकांना मानधन देत नाही, तसेच आतापर्यंतच्या सर्व संपादकांनीही कोणतेही मानधन न घेता जवळजवळ पूर्णवेळ हे काम केले आहे. आपण सर्वानीही वेळोवेळी आम्हाला साथ दिली आहे.

परंतु, काही काळापूर्वी पोस्ट खात्याने कमी दराच्या टपालहशिलासह अंक पाठविण्याची आमची सवलत काढून घेतली. एवढेच नव्हे तर सुमारे तीन लाखांवर दंड ठोठावला.

पुढे वाचा