विषय «चिकित्सा»

चार्वाक ते आगरकर आणि सद्यःस्थिती

प्रथमच सांगतो की, माझे एकुणच वाचन फार मर्यादित आहे आणि प्रतिपाद्य विषयाचे तर खूपच कमी आहे. तरी पण आगरकरांच्या चरित्रातून, लेखनातून उद्भवलेले काही विचार कुठेही, विशेषतः आगरकर विशेषांकात न आढळल्यामुळे हे टिपण. त्यानंतर काही आनुषंगिक विचार.
आगरकरांच्या विवेकवादाचे सूत्र पूर्वीच्या एखाद्या तत्त्वशाखेशी जोडायचे असल्यास ते चार्वाकमताशी जोडता येते. प्रत्यक्ष प्रमाणाने वा सार्वत्रिक अनुभवाने जाणवत असेल ते सत्य, बाकी सर्व असत्य, असे उभय विचारप्रणालीतील साम्य ढोबळमानाने सांगता येईल. जगाचे आदिकारण, मृत्यूनंतर काय, असले प्रश्न पुरेशा साधनांच्या अभावी गैरलागू ठरतात, असा अज्ञेयवाद दोघांनाही अभिप्रेत होता.

पुढे वाचा

वैज्ञानिक दृष्टिकोन

भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक दृष्टिकोन, किंवा चिकित्सक बुद्धी, हा शब्द वापरणे जास्त अर्थवाही होणार नाही काय? ही चिकित्सक बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसांच्या अंगी असलेली मी पाहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्यांच्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे.

पुढे वाचा

सातार्‍याचे विचारवेध संमेलन

साताऱ्याला जायची फार दिवसांची इच्छा होती. परवा अचानक योग आला. ‘विचार करू शकणाच्या माणसांची मतं बनविण्याची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी सातार्‍याला चार मित्रांनी एक धडपड सुरू केली आहे. समाजपरिवर्तनाचे काम ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धम्‍’ या कोटीचे असते. या मित्रांनी त्या कामासाठी एक मंडळ स्थापन केले. त्याला ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ असे नाव दिले. विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा वेध अकादमीने घ्यायचे ठरवले. त्यातून हे विचारवेध संमेलन आकाराला आले. विषयधर्मजिज्ञासा. या शतकात आपल्या देशात धर्माच्या नावावर मोठमोठे उत्पात घडले. देश दुभंगला. लक्षावधींचे प्राण, वित्त आणि अब्रू लुटली गेली.

पुढे वाचा