विषय «तंत्रज्ञान»

मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विदर्भातील शेतकरी – आत्महत्या

संसदेच्या कृषि स्थायी समितीने जनुकांतरित पिकाच्या विरोधात सादर केलेला भक्कम पुरावा निष्प्रभ करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. ‘हरित कार्यकर्त्यांचे काम’ असे म्हणून त्याची हेटाळणी होत आहे. हा साडेचारशे पानांचा अहवाल हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या खासदारांनी मिळून दोन ते अडीच वर्षे केलेल्या अभ्यासाचे फळ आहे. ह्या खासदारांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे, डावे आणि उजवे अशा सर्वांचा समावेश होता, ज्यांचे सर्वसाधारणपणे एकमेकांशी मतैक्य होत नाही. त्या अर्थाने ते, जनुकांतरित बियाणे बनविणाऱ्या कंपन्या, त्यांनी प्रायोजित केलेल्या स्वयंसेवी संस्था, जनसंपर्काची अभिकरणे आणि तथाकथित शेतकरी नेते ह्यांनी प्रसारमाध्यमे, जनता आणि धोरणकर्ते ह्यांच्याकडे केलेल्या एका खोट्या प्रचाराचे खंडन होते.

पुढे वाचा

मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology- IBT)

विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. तीमधील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षण केल्यानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या एका वर्षाच्या DBRT (Diploma in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये यासाठी आश्रमाची अध्यापनपद्धत शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी व दहावीच्या मुलांबरोबर काम करायला विज्ञान आश्रमाने सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षांत आणखी दोन गावांत प्रयोग सुरू झाले.

पुढे वाचा

औद्योगिक क्रान्तीचे पडसाद

१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या बदलांमागचे महत्त्वाचे कारण होते औद्योगिक क्रांती.

तांत्रिक-औद्योगिक क्षेत्रातील तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे क्षेत्रांतील हे बदल आमूलाग्र स्वरूपाचे होते. त्यांचे क्रांतिकारक स्वरूप लक्षात येण्याच्या आधीच माणसे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात लोटली गेली होती.

पुढे वाचा