विषय «तत्त्वज्ञान»

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध [taboo]
(पूर्वार्ध)
नवीन लैंगिक नीतीची रचना करताना विचारायचा पहिला प्रश्न: ‘लैंगिक संबंधांचे नियमन कसे करावे?’ ही नाही. तो ‘पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना लैंगिक विषयासंबंधी कृत्रिम अज्ञानात ठेवणे इष्ट आहे काय?’ हा आहे. या प्रश्नाला पहिले स्थान देण्याचे माझे कारण असे आहे की, मी या प्रकरणात दाखविण्याचा यत्न करणार असल्याप्रमाणे, लैंगिक विषयातील अज्ञान हे कोणत्याही व्यक्तीला अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून असे अज्ञान टिकवून ठेवणे ज्या व्यवस्थेत अवश्य असेल ती इष्ट असू शकत नाही. मी असे म्हणेन की लैंगिक नीती अशी असावी की ती सु–टाक्षित लोकांना इष्ट वाटावी, आणि तिचे आकर्षण अज्ञानावर अवलंबित नसावे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती
लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे.

स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा बदल करण्यात आला. ज्या कल्पनांमुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ज्यांचा विकास झाला अशा कल्पनांतून मेरी वॉलस्टोनक्राफ्टचे ‘स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन’ (१७९२) हे पुस्तक निर्माण झाले होते.

पुढे वाचा

सॉक्रेटीसीय संवाद (उत्तरार्ध)

यूथिफ्रॉन

अनुवादक – प्र. ब. कुळकर्णी

(सॉक्रेटिसाची एक प्रसिद्ध वादपद्धती आहे. ती ‘सॉक्रेटिसीय व्याजोक्ती (‘Socratic Irony’) या नावाने प्रसिद्ध आहे. या व्याजोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या संवादाकडे बोट दाखविता येईल. साक्रेटिसाच्या संवादांचे एक उद्दिष्ट कोणत्यातरी संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करणे हे असले तरी त्यांचे दुसरे ही एक उद्दिष्ट असते, आणि ते म्हणजे जे ज्ञानी असल्याचा टेंभा मिरवितात ते खरोखर अज्ञानी असतात हे दाखविणे. त्याकरिता ‘एखाद्या विषयासंबंधी आपण अगदी अनभिज्ञ आहोत असे सांग आणावयाचे आणि कुशल प्रश्नांच्या साह्याने दुसर्‍याला आपल्या अज्ञानाची पुरेपूर जाणीव करून द्यावयाची अशी सॉक्रेटिसाची व्यूहरचना असते.

पुढे वाचा

सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)

प्रास्ताविक
अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी

पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक उत्तम नमुना म्हणून हा संवाद उल्लेखनीय आहे.

सॉक्रेटिसाच्या तत्त्वज्ञानाची आपल्याला जी माहिती आहे तिचे स्रोत दोन, एक प्लेटोने लिहिलेले संवाद, आणि दुसरा झेनोफोन (Xenophon) ने लिहिलेल्या आठवणी.

पुढे वाचा