विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

वा.म.जोशी यांची नीतिमीमांसा

वा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्‍या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली एकदोन पुस्तके सोडली तर नीतिशास्त्रप्रवेशाच्या तोडीचे किंवा त्याच्या जवळपासही जाऊ शकेल असे पुस्तक मराठीत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

या लेखात या संपूर्ण ग्रंथाचा परामर्श घेण्याचा विचार नाही.

पुढे वाचा

प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.

पुढे वाचा