सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. “सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का?” असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत.
विषय «समाज»
साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे
रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.