विषय «इतर»

मानवी लैंगिक जीवन – समज/गैरसमज

(१) पुरुषांच्या लैंगिक समस्या कोणकोणत्या असतात ?
अविवाहित/विवाहित पुरुषांमध्ये जवळ जवळ सर्वच लैंगिक समस्या थोड्या प्रमाणात कधी ना कधी तरी अनुभवास येतात. त्यांमध्ये नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन, विलंबित वीर्यपतन, कामपूर्तीचा अभाव, कामपूर्ती उशीरा होणे, कामवासना अति वाढणे, कामवासना कमी होणे, वेदनायुक्त संभोग ह्या समस्या असतात. त्यांतील काही समस्या परिस्थितीनुरूप असतात, इतर शारीरिक व मानसिक कारणांनी लैंगिक समस्या निर्माण होतात. ह्याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण पुढे पाहणार आहोत.
पुरुषांच्या गैरसमजामुळे ते घाबरतात व समस्या स्वतः निर्माण करतात, त्यात, हस्तमैथुन वाईट असते, स्वप्नातील वीर्यपतन (चुकीचा शब्दप्रयोग स्वप्नदोष) वाईट असते, अति हस्तमैथुनाने वीर्य पातळ होते, शिश्न वाकडे होते, नपुंसकत्व येते, पिता बनू शकत नाही, शीघ्रवीर्यपतन होते, वजन कमी होते.

पुढे वाचा

आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे असे अनेक प्रकार चालू असतात. बालविवाह होत आहेत ते तर टी.व्ही.वर दिसतात, पण टीव्हीवर न दिसणारे अनेक प्रकार आहेत. भूतपिशाच्चाची बाधा, भानामती, करणी, अंगात येणे असे अनेक प्रकार स्त्रीमनोरुग्णांचे आहेत.

पुढे वाचा

नकोशी !

इ.स. २००५ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील गोष्ट. हॉस्पिटलच्या सभोवतालच्या परिसरात ताजुद्दीन बाबांच्या दर्यासमोर वार्षिक उरूस जोरात होता. आमच्या प्रादेशिक पातळीवरच्या ह्या शासकीय रुग्णालयात रोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार होतात. पण उरुसाच्या वेळी आमच्या परिसरातल्या एका शेडवजा इमारतीत जिला दर्गाह म्हणतात ह्या १५ दिवसांत रोज अक्षरशः हजारो भुते शांत करण्यात येत होती. बाबांच्या कृपेने चमत्कार घडून ती भुते झाडावरून वानर पळावेत तशी रुग्णांच्या अंगातून निघून जातात असा लक्षावधींचा विश्वास होता. ह्या यात्रावजा उरुसात रस्त्याच्या एका कडेला एक सावळीशी तिशी-बत्तीशीची मुलगी आपल्या दोन लहानग्यांना सांभाळत एक चहाचा ठेला चालवीत होती.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल)
प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके
लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक उद्बोधन, लेखन, व्याख्याने यामध्ये ते कार्यमग्न असतात. त्यांचा मुक्काम सांगली येथे असतो.
माणसे जशी वागतात तशी का वागतात हे एक कोडे आहे. शायर अकबर इलाहाबादी म्हणतात ख्याल दौडा निगाह उठी क़लम ने लिखा ज़बान बोली मगर वही दिल की उलझनें किसी ने इसकी गिरह न खोली । विचार धावला, नजर उठली (नजरानजर झाली), लेखणीने लिहिले, जीभ बोलली, पण मनाची (हृदयाची) तीच कोडी, त्यांची गाठ कोणी सोडवली नाही.]

पुढे वाचा

पत्रलेखन

सरस्वती के. देव, १६८ एफ वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२. दूरध्वनी : २३८५१३३१
नोव्हेंबरचा आजचा सुधारक वाचला. नेहमीप्रमाणे चांगला आहे. त्यातील शारदा यांची सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख वाचला. त्यात सुहासिनीची करुण कहाणी फारच हृदयद्रावक आहे.
अजूनही पालक म्हणजे मुलाचे वा मुलींचे आई-वडील. ते शिक्षित आहेत, सुधारक आहेत पण बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत. केवळ पैसा हे माध्यम आजकाल फार महत्त्वाचे आहे. मुलगी एवढी शिकलेली आहे. पण व्यावहारिक दृष्टिकोण नाही. मागणी आली म्हणून हुरुळून जाऊन आईवडिलांनी लग्न उरकले. एरवी एवढ्या-तेवढ्यावरून वाद करणारी मुलगी विचार न करता आंधळेपणाने त्या मुलाशी लग्न करते.

पुढे वाचा

श्रॉडिंजरचे गूढवादी दर्शन

(भाषांतर)

हायसेनबर्ग वगैरे मंडळी ‘मॅट्रिक्स मेकॅनिक्सची’ (चरीीळ चशलहरपळली) बांधणी करीत होती त्याच वेळी इर्विन श्रॉडिंजरने, (Erwin Schroedinger [1887-1961]), स्वतंत्ररीत्या, तरंग यांत्रिकी (Wave Mechanics) चा शोध लावला. लगेचच, ते मॅट्रिक्स मेकॅनिक्सच्या समतल असल्याचे सिद्ध झाले. शिवाय हे Wave Mechanics अनेक बाबतींत Matrix Mechanics पेक्षा सुलभ व सुंदर आहे असे दिसून आले. म्हणूनच श्रॉडिंजरचे Wave Mechanics लवकरच आधुनिक पुंजयांत्रिकीच्या (Quantum Mechanics) हृदयस्थानी विराजमान झाले व सर्वत्र त्याचा गणिती शस्त्र म्हणून वापर चालू झाला.

श्री. केन् विल्बर (Ken Wilber) यांनी संपादित केलेल्या Quantum Questions या संग्रहातील श्रॉडिंजरचे खालील लिखाण, (उतारा) (बहुधा) What is Life ह्या पुस्तकातील आहे.

पुढे वाचा

भारतीय राज्यघटना व प्रचलित समाजव्यवस्था

भारताला स्वतःची राज्यघटना हवी अशी मागणी प्रथमतः १९२२ साली म. गांधी यांनी केली. त्यावेळी आणि त्यानंतरसुद्धा अनेकवेळा ब्रिटिश सरकारने ती फेटाळली. पेब्रुवारी १९४६ मध्ये ज्यावेळी नाविकांनी बंड केले. त्यावेळी सैन्य आता आपल्या ताब्यात राहणार नाही याची ब्रिटिशांना खात्री पटली आणि मे १९४६ पासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर डिसें. ४६ मध्ये भारताची घटना तयार करण्यासाठी स्वतंत्र घटनासमिती निर्माण करण्याचे ठरले.
या घटनासमितीमध्ये प्रत्येक राज्याच्या विधानसभेने लोकसंख्येच्या प्रमाणात असे २९२ सभासद पाठविले होते आणि ९३ सभासद संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. साहजिकच या प्रतिनिधींना गरिबांबद्दल किंवा दलितांबद्दल कळवळा असण्याचे कारणच नव्हते.

पुढे वाचा

पत्रबोध

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, दूरभाष : ९५२१४८-२३८६५२
आ.सु.च्या सप्टे.०७ च्या अंकारा “वायकांचे आ.सु.बद्दलचे विचार मागविले आहेरा” हे फार चांगले झाले. दि.य.देशपांडे ह्यांनी आसुच्या पहिल्या अंकारा (एप्रिल १९९०) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की “शंभर वर्षांपूर्वीचे जे आगरकरांनी समाजास बुद्धिवादी घडविण्याचे कार्य करण्यास आरंभ केला; ते आज अपुरे ठरल्यामुळे पूर्णत्वाला नेण्याचे कार्य करण्याच्या हेतूने सुधारक काढीत आहोत. विवेकवादाच्या बरोबरच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इ. मूल्ये हाताळली तरी प्राधान्य विवेकवादाच्या प्रसाराला आहे.”
मुंबईला मराठी विज्ञान परिषद आहे. ते विज्ञान छापतात.

पुढे वाचा

लेखकाचा अंगरखा

समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांच्याकडे विद्यार्थिदशेत एकच सदरा असल्याने रोज रात्री धुऊन वाळत घालीत व दिवसा पेहरत. ही कथा अनेकांनी ऐकली असेल. अमेरिकन साहित्यिक एडगर अॅलन पो (ज्याने आधुनिक रहस्यकथा लेखनाचा पायंडा पाडला) आणि नॅथानियल हॉथॉर्न हे दोघे एकत्र राहत. दोघेही साहित्याच्या मस्तीत धुंद, परंतु खायला चण्या-कुरमुऱ्यांचेही वांधे. त्यांच्या साहित्यावर लुब्ध होऊन एका धनिक स्त्रीने त्यांना पार्टीचे निमंत्रण दिले. दोघे मिळून एकच कोट बाहेर जाताना आळीपाळीने वापरीत. आता आली का पंचाईत ? पो ने बाईसाहेबांना विचारले, ‘बाईसाहेब, आम्ही बरोबर न येता, एकानंतर दुसरा असं आलेलं चालेल का?’

पुढे वाचा

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात.

पुढे वाचा