विषय «इतर»

सुधारकाचा एक मित्र हरवला

आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक
ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे राखून न ठेवता मुक्तकंठाने जी दाद दिली ते त्यांचे शेवटचेच लेखन ठरले. गेल्या ऑगस्टच्या २५ तारखेला ते गेलेच.
हरिभाऊ प्रा. ह.चं.घोंगे सुधारकाचे हितचिंतक अन् हुकमी लेखक होते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८)
ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता ते वैज्ञानिकदृष्ट्या चूक ठरत नाहीत. कारण जॉन हॉरगन हे बी.ए. (इंग्लिश) असून ते विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी पाचही जणांच्या संशोधनात कुठे व कशी चूक आहे हे नमूद करावयास हवे होते.

पुढे वाचा

मुस्लिमांची सुधारणा शक्य आहे काय?

[श्री इब्न व क (Ibn Warraq) हे मी मुस्लिम का नाही (Why I am not a Muslim) ह्या ग्रंथाचे प्रसिद्ध लेखक आहेत. ते अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर एन्क्वायरी’मध्ये काम करतात. त्यांनी आजवर केलेल्या लिखाणात, ‘कुराण’, ‘कोणते कुराण ?’, ‘इस्लाम सोडणे’… इ. लेखन प्रसिद्ध आहे. ते मूळचे भारतीय, आधी युरोपात स्थलांतरित आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या रॅडिकल ह्यूमॅनिस्ट ह्न मार्च २००७ मधील लेखाचा मुक्त अनुवाद ] माझ्या युक्तिवादाची मांडणी :
धर्म-सुधार काय आहे?
1.वैश्विक-मानवाधिकाराचा उद्घोष Universal Declaration of Human Rights (UDHR) जो १९४८ मध्ये करण्यात आला त्याहून हा सुधार वेगळा कसा?

पुढे वाचा

पत्रचर्चा

डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५.
श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे.
मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे यांच्या लेखातूनच कळले.
सायंटिस्ट म्हणून जात, धर्म कुण्याही विज्ञानवाद्याला मान्य नसावे हे मी आजपर्यंत मानत आलो आहे. विज्ञानातही पौर्वात्य व पाश्चात्त्य विज्ञान असा फरक मानत नाहीत.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन

भारतीय स्त्रीजीवन
एकोणिसाव्या शतकाच्या प्रबोधनाच्या उलाढालींमध्ये स्त्रियांचे प्रश्न केंद्रस्थानी होते. राम मोहन राय, विद्यासागर, अक्षयकुमार दत्त, केशवचंद्र सेन अशा अनेक धुरंधर व्यक्तींनी स्त्रियांना कौटुंबिक दडपणातून बाहेर काढून सुशिक्षित व सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी स्वतःच्या घरातही स्त्रीशिक्षणाचे प्रयोग केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या घराण्यात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या स्त्रियांना इंग्रजी, बांगला धर्मग्रंथ वगैरे वाचायला-लिहायला शिकवण्यासाठी परदेशी शिक्षिका व वैष्णवी नेमल्या जात असत. तसेच देवेंद्रनाथ कर्मठ विचारांचे होते व घरातल्या मुलीबाळींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठविणे त्यांना मंजूर नव्हते.

पुढे वाचा

गड्या, तू बोलत का नाही ?

प्रिय वाचक,
सुधारक कोणासाठी आहे असा प्रश्न मला मधून-मधून पडतो, कधी तो वाचकही विचारतात. स्वेच्छेने, काही एका अपेक्षेने जे वर्गणीदार झाले त्यातलेही कोणी हा अवघड प्रश्न विचारतात. काही भले वाचक, आपणच वाचक म्हणून कमी पडतो अशी समजूत घालून घेतात. पण हा प्रश्न गंभीरतेने घेण्यासारखा आहे. ग्राहकाचा कधीच दोष नसतो असे म्हणतात. त्या चालीवर वाचकांचा उगीच रोष नसतो असे मानायची माझी तयारी आहे. म्हणून वाचकाचे म्हणणे ऐकायला मी उत्सुक असतो. कोणत्याही वाययीन उपक्रमाला प्रतिपोषण (षशशव लरलज्ञ) हे आवश्यकच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत की, वाचकहो, बोला!

पुढे वाचा

दि.य.दे. आदरांजली

गेली नागपंचमी प्रा. दि.य.देशपांडे (ती. नाना) यांचा आज तसा नव्वदावा जन्मदिन ! काही माणसे जन्माला येतात ती केवळ इतरांना काहीतरी देण्यासाठी ! देता देता ती कुठे नि कधी हरवतात हे कळतही नाही. नानांचे देहदान अन् चक्षुदान हे दैहिक पातळीवर असले तरी ‘देहाचे पारणे फिटणे’ ही विज्ञाननिष्ठ भूमिका त्यामागे आहे. आयुष्यभर देहाची जराही चिंता न बाळगणाऱ्या नानांनी जाताना देहालाही दानाचे भाग्य मिळवून दिले! ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीचे महत्त्व आम्हाला, पटो न पटो, आम्ही मात्र साक्षात् ‘साधुत्व’ अंगी बाणलेल्या प्रा.

पुढे वाचा

राज्यघटनेत सुधारणा

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानसभेत भारताची राज्यघटना मंजूर करून स्वीकारण्यात आली. राज्यघटना अनंत काळपर्यंत तशीच अचल रहावी अशी कल्पना कधीच नव्हती. अनेक वर्षांच्या वापरानंतर या घटनेमधील त्रुटी लक्षात येतील, तसेच काळाबरोबर मानवी जीवनात बदल होत जाऊन, घटनेतही त्यानुसार बदल करावे लागतील, हे अपेक्षितच होते.
आजतागायत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. पण त्यांचे स्वरूप बहुतेक वेळा कायदा करण्यातील घटनात्मक अडचणींमधून मार्ग काढण्याचे – पळवाट तयार करण्याचे होते. आज आपण प्रयत्न करणार आहोत तो अनुभवापासून शिकून, घटनेत सुधारणा करण्याचा आहे. कोणत्याही तात्कालिक अडचणीवर मात करण्यासाठी हा प्रयत्न नाही, तर भारतीय जनमानसाला, जनवर्तनाला अधिक चपखल बसणारी अधिक चांगली घटना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

समूहाचे मानसशास्त्र

‘परिस्थितिजन्य’ मानसिकता
‘दुष्ट लोकच दुष्कृत्य करीत असतात’ या विधानाविषयी जगातील यच्चयावत सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघ-संस्थांचे एकमत आहे. जगरहाटीची समज नसलेली लहान वयातील मुले-मुलींचा अपवाद वगळता इतरांना कशाही प्रकारे वागण्याची मुभा असणे, त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि वरील प्रकारचे विधान करणे जगातील सर्व समाजामध्ये रूढ आहे.
परंतु या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या व साध्या नाहीत. समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ज्ञ यांच्याजवळील पुरावे काही वेगळेच सांगत आहेत. या क्षेत्रातील संशोधकांच्या मते बऱ्याच वेळा दुष्कृत्याला भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते, व्यक्ती नव्हे. दुष्कृत्य करणाऱ्यांमागे त्यांच्या अवती भोवती असलेल्यांचा फार मोठा प्रभाव असतो, हे चटकन लक्षात येत नाही.

पुढे वाचा

वर्ण आणि जाती

भारतीय उपखंडातील वर्णव्यवस्था हा कायम चर्चेचा विषय आहे. बहुतेक वेळा हे वाद अपुऱ्या माहितीवर आधारित असतात. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था ह्यांपैकी आधी काय निर्माण झाले ह्या संबंधी ब्रिटिश कालात अनेक वाद झाले. सर्व पाश्चात्त्य विद्वानांचे मत होते की आधी चातुर्वर्ण्य होते व त्याच्या विभाजनातून जाती निर्माण झाल्या. ह्या सिद्धान्ताला फक्त इरावती कर्वे ह्यांनी विरोध केला. त्यांनी दाखवून दिले की वर्णव्यवस्था ही तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या विविध ज्ञातींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे. ह्या जाती कश्या अस्तित्वात आल्या ह्यासंबंधी विविध अंदाज बांधण्यात आले. पण पन्नास वर्षांपूर्वी आमचे प्राचीन इतिहासाचे ज्ञान अपुरे असल्यामुळे ज्ञातिसंस्थेचा उद्गम व विकास निश्चित सांगणे कठीण होते.

पुढे वाचा