विषय «जीवनशैली»

मेंढा (लेखा) व ग्रामसभा

  • महाराष्ट्र राज्यात पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात, गडचिरोली शहरापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर, जगाने आदर्श घ्यावा असे १००% आदिवासींचे मेंढा गाव वसलेले आहे. गावाभोवती पसरलेले घनदाट जंगल ह्या गावाचे खरेखुरे वैभव असून गावातल्या माणसांसाठीची ही विशाल शिक्षणसंस्थाही आहे. ह्या जंगलातील झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक एकंदर सगळ्या सजीव आणि निर्जीव घटकांच्या सान्निध्यात गावातील मुले जे मूल्याधिष्ठित शिक्षण घेतात, ते कोणत्याही शाळेत उपलब्ध नाही. ह्या माणसांच्या सहवासात आणि गावासह गावाभोवतीच्या सबंध परिसरात जंगलच मानवाचा मूळ अधिवास आहे, ही हरवलेली जाणीव जिवंत होते. चंगळवादाच्या झगमगाटात गळून पडलेली माणसाची नाळ पुन्हा जंगलाशी (मानवाचा मूळ अधिवास) जुळते.
पुढे वाचा

मेंढा लेखा: जैव-सामाजिक प्रणाली विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना!

मुख्य शब्द: जैव-सामाजिक प्रणाली (social-ecological system), बहुकेन्द्रित शासन (polycentric governance), अनुकूलन क्षमता (adaptation), स्वसंघटन (self-organization), संश्लेषण (synthesis), तंत्रविचार (systems thinking), एलिनोर ओस्ट्रॉम, Tragedy of Commons, सह-उत्क्रांती (coevolution), Panarchy, Anthropocene.

प्रस्तावना आणि विषय प्रवेश
गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावात झालेला ग्रामस्वराज्याचा विलक्षण प्रयोग, आणि एकंदरच विकेंद्रीकरणाच्या धोरणांमुळे जेव्हा माणसांच्या समूहांमध्ये स्व-संघटन[A] होऊन काहीतरी नव-सर्जन घडते, ते बघून मानवी मन सुखावते, आनंदी होते. असे सर्जन बघून मन का सुखावते? गोष्ट मेंढा गावाची[1] ह्या पुस्तकात मिलिंद बोकील लिहितात – “विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झाली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही.

पुढे वाचा

युवकांनी ग्रामसभेत सहभाग वाढवावा…

‘आजचा सुधारक’च्या अंकासाठी ग्रामस्वराज्य हा विषय हातात आला त्याच्या आठच दिवसांआधी, मी राहतो त्या परिसरातल्या एका गावात मोठा इतिहास झाला होता. गट-ग्रामपंचायत असलेल्या त्या गावच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला होता. कारण गावकऱ्यांना न पटणाऱ्या काही मोठ्या घडामोडी गावात घडल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवाराने वस्तीवरच्या गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी निवडणुककाळात पाईप आणून दिले होते. परंतु निवडणूक संपल्यानंतर वस्तीवरच्या लोकांना पाणी भरण्यासाठी दिलेले पाईप परत मागितले. नंतर दोन महिन्याने वस्तीशेजारी असणाऱ्या भेंडगावच्या एका शेतकऱ्याला वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची कीव आली आणि त्याने त्याच्या शेतीतल्या विहीरीचं पाणी देण्याचे ठरवले.

पुढे वाचा

पंचायती राज: ३० साल में कितना मजबूत हुआ लोकतंत्र?

पार्श्वभूमि

  • तीन स्तरीय पंचायती राज व्यवस्था के ३० से अधिक साल पूरे हो गए हैं. साल १९९२ में संविधान में संशोधन के साथ इस पंचायती राज व्यवस्था की शुरुआत हुई थी.
  • ७३वें संशोधन की वजह से आदिवासी क्षेत्रों (अनुसूचित क्षेत्रों) में पंचायती राज के विस्तार और वन अधिकारों के लिए कानून बने.
  • अपनी टिप्पणी में सी आर बिजॉय लिखते हैं कि लोकतंत्र को बिना मजबूत किये सत्ता के विकेन्द्रीकरण की ३० वर्षों से अधिक की यह कहानी आशा से निराशा की तरफ जाती है.
पुढे वाचा

आदिवासी स्वशासन

महात्मा गांधी ने ‘हिन्द स्वराज’ के द्वारा सत्ता के विकेंद्रीकरण को दृष्टि दी थी, क्योंकि उन्हें गाँव, लोग, उनकी सामुदायिक समझ और प्राकृतिक संसाधनों के तालमेल का अनुमान था. इस नजरिये को आगे बढ़ाते हुए जवाहरलाल नेहरू ने प्रधानमंत्री बनने के बाद आदिवासी समुदायों के कल्याण और विकास के समग्र दृष्टिकोण के तहत आदिवासी स्वशासन के पाँच सूत्र दिए. इन्हें ‘आदिवासी पंचशील’ के रूप में भी जाना गया. २ अक्टूबर, १९५४ को मुख्यमंत्रियों को उन्होंने एक पत्र लिखकर इन पाँच सूत्रों को अमल में लाने का सुझाव दिया: 

पहला, आदिवासी समुदायों की संस्कृति व पहचान का सम्मान किया जाए.

पुढे वाचा

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का?

‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य आहे का? ह्या कुटुंबाचा धर्म कोणता असेल? ह्या कुटुंबाचा देव कोण असेल?
‘Man is an animal that makes bargain’
देव, विश्व, आणि निसर्ग ही तिन्हीं एकाच गोष्टीची नावें आहेत.’बायबलमध्ये म्हटले आहे तसे, देव कुणी वेगळा नाही. असे जाहीरपणे प्रकट केल्याबद्दल, थॉमस आयकनहेड नावाच्या वीस वर्षे वयाच्या तरुणाला अठराव्या शतकात मृत्युदंड दिला होता. देवाच्या नावाने धर्म काय करू शकतो, त्याची ही झलक!

१.
धर्मांच्या उदयामुळे मनुष्याचे कल्याण साधले का? धर्माने मनुष्याला नीतिमान बनवले का? धर्माने मनुष्याला दैववादी केले का?

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?

नमस्कार,

हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल?

पुढे वाचा

देव नाकारणे हे विवेकवादाचे बाय-प्रॉडक्ट

ब्राईट्स सोसायटीच्या दशकपूर्तीला नास्तिक परिषदेच्या निमित्ताने जमलेले आपले माननीय प्रमुख पाहुणे जावेद अख्तरजी, मंचावरील आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व नास्तिक मुक्तचिंतक मित्र-मैत्रिणींनो.

सर्वप्रथम, या पुरस्कारासाठी माझी निवड केली यासाठी ब्राईट्स सोसायटीच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. अतिशय प्रांजळपणे सांगायचं तर हा पुरस्कार प्राप्त करण्याची पात्रता माझी आहे की नाही हे मला अजिबात माहीत नाही. पण तरीही अतिशय विनम्रपणे याचा स्वीकार करते. मंचावर उपस्थित जावेद अख्तर सर एक शायर किंवा स्क्रीन-प्ले-रायटर म्हणून आपणा सर्वांना अवगत आहेत. मी नास्तिक झाल्यापासून रॅशनॅलिटीसाठी त्यांना फॉलो करते आणि रॅशनॅलिटीसाठी भारतातले म्हणावे असे एक आयडॉल कदाचित तेच असतील.

पुढे वाचा

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा