विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

वा.म. जोशी आजही प्रस्तुत का वाटतात?

मराठी वाङ्येतिहासातील १८८५ ते १९२० या महत्त्वपूर्ण कालखंडात दामन मल्हार जोशी यांचा उदय झाला; इतकेच नव्हे तर कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिकही मिळवला. हा नावलौकिक दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे वामन मल्हारांनी तत्कालीन बुद्धिजीवी, रसिक वाचकांशी आपल्या कादंबच्यातून — विशेषतः रागिणीतून — संवाद साधला; आणि दुसरीकडे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या साक्षेपी समीक्षकाचे तत्काल लक्ष वेधून घेतले. वाचक व समीक्षक यांना एकाच वेळी आवाहन करणे, त्या कालातील सगळ्याच मोठ्या लेखकांना साध्य झाले, असे म्हणता येणार नाही. हे खास वामन मल्हारांचे वैशिष्ट्य आहे.

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य हे की, त्यांच्या या आवाहनातील सातत्यही वेगवेगळ्या कारणांमुळे टिकून राहिले.

पुढे वाचा

प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य कौटुंबिक सुखाला वंचित झाल्यामुळे पुष्कळ उच्चविद्याविभूषित मंडळी मंत्र-तंत्र, व्रतवैकल्य अशा मार्गांकडे वळतात असे आपल्याला दिसते. लग्नाआधीचा ध्येयवाद लग्नानंतर जड ओझ्यासारखा दूर फेकला जातो. आपणही त्यांना दोष देत नाही.

पुढे वाचा