विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

द मॅजिशियन – पुस्तक परिचय

कॉम टॉईबिन या आयरिश लेखकाची थॉमस मान याच्या चरित्राचा व वाङ्मयाचा वेध घेणारी ‘द मॅजिशियन’ ही कादंबरी नुकतीच वाचली. नोबेल पारितोषिक विजेत्या थॉमस मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही मी वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष. मला ते ललित-चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसवू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या अंतरंगात शिरून ते वाचकांना उलगडून दाखवावे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

मान जर्मनीमध्ये जन्मला. वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर.

पुढे वाचा

हमरस्ता नाकारताना : पारदर्शी जगण्याचे धैर्य

अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून वेगळ्या वाटा चोखाळण्याची आकांक्षा असलेली. चळवळींमध्ये भाग घेणारी, त्यांत रमणारी आणि त्यामुळेच पुरोगामी विचार अंगिकारून स्वतःचे आंतरजातीय लग्न ठरवल्यामुळे वेळोवेळी घरच्यांकडून दुखावली जाणारी, विचारी व समंजस वागूनही जवळच्यांकडून वागणुकीतले परकेपण मिळणारी.

पुढे वाचा

चार्वाक ते आगरकर आणि सद्यःस्थिती

प्रथमच सांगतो की, माझे एकुणच वाचन फार मर्यादित आहे आणि प्रतिपाद्य विषयाचे तर खूपच कमी आहे. तरी पण आगरकरांच्या चरित्रातून, लेखनातून उद्भवलेले काही विचार कुठेही, विशेषतः आगरकर विशेषांकात न आढळल्यामुळे हे टिपण. त्यानंतर काही आनुषंगिक विचार.
आगरकरांच्या विवेकवादाचे सूत्र पूर्वीच्या एखाद्या तत्त्वशाखेशी जोडायचे असल्यास ते चार्वाकमताशी जोडता येते. प्रत्यक्ष प्रमाणाने वा सार्वत्रिक अनुभवाने जाणवत असेल ते सत्य, बाकी सर्व असत्य, असे उभय विचारप्रणालीतील साम्य ढोबळमानाने सांगता येईल. जगाचे आदिकारण, मृत्यूनंतर काय, असले प्रश्न पुरेशा साधनांच्या अभावी गैरलागू ठरतात, असा अज्ञेयवाद दोघांनाही अभिप्रेत होता.

पुढे वाचा