विषय «मनोगत»

पूर्णविराम की स्वल्पविराम ?

आजचा सुधारक’चा हा अंतिम अंक वाचकांपुढे सादर करताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विवेकवादाचे निशाण फडकवीत ठेवण्याचा एक प्रामाणिक आणि प्रगल्भ प्रयत्न काळाच्या पडद्याआड जात आहे ह्याचे आत्यंतिक दुःख आहे, तर दुसरीकडे अशा प्रयत्नाच्या प्रासंगिकतेची लख्ख मोहर जाणत्यांच्या मनावर उमटल्याचे समाधानही आहे.

वैचारिक नियतकालिकाची वाटचाल नेहमीच खडतर असते. आमचे मूल्यमापन समकालीन व भविष्यातील अभ्यासक करतील, तसेच काळही करेल. पण ह्या टप्प्यावर आम्हाला आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय वाटते? गेली २७ वर्षे ‘आजचा सुधारक’ने नेमके काय केले? इतक्या साऱ्या नियतकालिकांच्या गर्दीत व माध्यमक्रांतीच्या गदारोळात त्याचे महत्त्व तरी काय?

पुढे वाचा

‘ल्यूटाइन बेल’

लॉइड्ज् ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्यावसायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात.

लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई. आपापले संभाव्य खर्च तपासा, अशी ती सूचना असे.

पुढे वाचा