मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००१

ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड
शुभेच्छा व्यक्त केल्याने शुभ झाले असते
तर कुत्रे कशाला फिरले असते
भोंगळे अन् हराममौत मरणाऱ्या
कुत्र्यासारखे हे आयुष्य कोणत्याही वेळी येऊ शकते
भरधाव वाहनाखाली कुठल्याही z
राजमार्गावर कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते शुभेच्छाही वांझ
जेथे शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक कवडीमोल असते
पसायदान अन् कविता तर नसते त्यांच्या गावी ही
[गेले काही दिवस नैवेद्य,पूजाअर्चा वगैरेंचे ‘सुपरिणाम’ सांगणारे काही लेख येत आहेत. त्यांचा फोलपणा दाखवणारी ही श्रीकृष्ण राऊतांची कविता, संक्षिप्त स्यात. (‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’.

पुढे वाचा

पत्रसंवाद

श्री. एस्. पी. तारे, टाईप D, 25/6, ऊर्जा नगर, चंद्रपुर — 442 404
महिलांच्या प्र नांबद्दल आजचा सुधारक फार जागरूक आहे पण त्यांत श्री. शरद जोशी यांच्या लक्ष्मी मुक्ती चळवळीला स्थान मिळायला हवे होते. १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या स्वीवर इस्टेटीमध्ये पत्नीच्या नावांचा पण संयुक्तपणे समावेश केला आहे. ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे. त्या खेड्यांमध्ये १०० शेतकऱ्यांनी पत्नीचे नाव शेतीच्या मालकींत समाविष्ट केले आहे. अशा खेड्यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढून प्रत्यक्ष भेट देऊन त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतात. प्रत्येक जिल्ह्यांतील किमान १०० गांवे ‘लक्ष्मी मुक्ती गांवे’ व्हावीत असा त्यांचा आग्रह व प्रयत्न आहे.

पुढे वाचा