मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००२

संपादकीय असुरक्षित एकाकी भाव—-आणि उतारा

भारताच्या इतिहासात सामान्य जनतेने युद्धांमध्ये किंवा मोठ्या राजकीय चळवळींमध्ये भाग घेण्याची उदाहरणे फारशी नाहीत. कौरवपांडवांचे युद्ध होत असताना म्हणे आसपासचे शेतकरी दिवसाभराची कामे आटपून युद्ध ‘पाहायला’ येऊन उभे राहत. यात ‘धर्मयुद्धा’मुळे बघ्यांना भीती वाटत नसण्याचा भाग असेलही, पण जास्त महत्त्वाचे हे की कोण जिंकणार, या प्र नाचे उत्तर शेतकऱ्यांना नांगरण-डवरण-रोपणी-कापणीपेक्षा महत्त्वाचे वाटत नसे. अठराशे सत्तावनच्या लढायांबाबतही अशाच नोंदी आहेत. लढाईच्या क्षेत्रात, लढाईच्या काळापुरती शेतीची कामे बंद पडत. एकदा का लढाई संपली की पुन्हा कामे सुरू होत. अगदी शिवकालातही कवींनी कितीही “बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था” असे सांगितले तरी शेतीच्या हंगामात सैन्ये उभारता येत नसत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सत्यरंजन साठे, अ-५, श्रीराहुल सहकारी गृहरचना संस्था, ८३/१० एरडवन, पुणे — ४११ ००४
माझा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संघाचा फतवा हा लेख आपण पुनर्मुद्रित केलात याबद्दल धन्यवाद. लेखाबद्दल दोन प्रतिक्रिया आपण मला पाठविल्या. त्यावरील माझे भाष्य यासोबत धाडत आहे.
श्री. गंगाधर गलांडे यांची प्रतिक्रिया पाहू या. घटनासमितीने पंतप्रधान म्हणून वल्लभभाई पटेल यांची शिफारस केली होती असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात. पण माझ्या वाचनात घटनासमितीने असा कुठलाही निर्णय कधी घेतलेला नव्हता. तसा घेणे हे घटनासमितीच्या कार्यकक्षेत येतच नव्हते. घटनासमिती ही पंतप्रधान कुणी व्हायचे हे ठरवणारी संस्था नव्हती तर पंतप्रधान कसा निवडला जावा हे ठरवणारी संस्था होती.

पुढे वाचा

खांडववन (धिस फिशर्ड लँड — ५)

भारतातील सर्वांत जुने मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्म (fossils) आहेत १.३ कोटी वर्षांपूर्वीचे. सत्तरेक लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्राणी वावरत. मग मात्र त्यांचे अवशेष सापडत नाहीत. ज्यांना मानव म्हणता येईल अशा प्राण्यांचा भारतातला इतिहास सुमारे सात लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. तेव्हापासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतभर छोटे छोटे संकलक गट पसरले. या गटांच्या संसाधन-वापराबद्दल आपण अंदाजच बांधू शकतो.
काही विशिष्ट भूप्रदेश व्यापणाऱ्या, शेजाऱ्यांशी या प्रदेशांवरून भांडणाऱ्या, आपसातच लग्नसंबंध करणाऱ्या टोळ्या, असे या गटांचे रूप असणार. निसर्गावर या गटांचा परिणाम क्षीण असणार, आणि त्या मानाने हवामान बदलाचे परिणाम तीव्र असणार.

पुढे वाचा

नवधर्मस्थापनेतून सामाजिक पुनर्रचना होऊ शकेल?

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुखे यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने नव्या धर्माची स्थापना करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी वर्तमानपत्रांतून काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि त्यावर उलटसुलट चर्चाही तेव्हापासून सुरू आहे. हे कार्य तसे प्रचंड मोठे आणि आव्हानात्मक आहे. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान, पूजापद्धती वगैरे कृतिरूप अभिव्यक्ती आणि रीतिरिवाज, दंडक, नीतितत्त्वे, यमनियम, आदर्श, मर्यादा, सामाजिक संबंध वगैरेच्या स्वरूपातील समाजनियमनात्मक प्रणाली–अशा तिन्ही बाजूंनी उभारणी धर्मस्थापनेसाठी आवश्यक असते. डॉ. साळुखे यांचा अधिकार आणि अनुभव ध्यानात घेता ते एकटाकी पद्धतीनेही हे आव्हान पेलू शकतील याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पुढे वाचा

(पुरुषकार्याची चढती शिडी)

“पुरुष हा शेवटी पुरुष आहे आणि स्त्री ही स्त्रीच आहे. मग ते कितीही शिकोत, काहीही करोत.” “स्त्रिय चरित्रं पुरुषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्यः””लिंगभेद सोडला तर बाकी सर्व बाबतीत स्त्रिया का नाही पुरुषांची बरोबरी करू शकणार?””स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता
असते, आणि पुरुष? पुरुष अनंतकाळचा प्रियकर आणि क्षणाचाच पिता असतो?” “Men are from Mars & Women are from Venus.”
प्रत्येकजण म्हणतो, स्त्री आणि पुरुष यांचे वागणे जन्मजातच वेगळे असते. ते का वेगळे असते आणि कोणकोणत्या बाबतींत वेगळे असते हे मात्र नीटपणे कुणी सांगू शकत नाही.

पुढे वाचा

विवेकवाद Reason आणि श्रद्धा

विवेकवादाचा अर्थ, गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे कदाचित त्याचा प्रधान अर्थ, कोणतेही विधान निर्णायक पुराव्यावाचून खरे न मानणे, आणि पुराव्याच्या प्रमाणात त्याच्यावर वि वास ठेवणे; निर्णायक पुरावा असेल तर विधान पूर्णपणे स्वीकारणे आणि नसेल तर जो पुरावा असेल त्याच्या प्रमाणात स्वीकारणे. अनेक वाचकांच्या दृष्टीने हे म्हणणे बरोबर नाही; ते म्हणतील की विधान स्वीकारण्याची ही अट अवश्य विधाने सोडल्यास इतर कोणत्याही विधानाचा पुरावा निर्णायक असू शकत नाही. परलोक, ई वर, मरणोत्तर अस्तित्व इत्यादि विषयांचा पुरावा देण्यासारखा नसतो, ती विधाने आपण श्रद्धेने स्वीकारतो.
पण हा आक्षेप घेणाऱ्या लोकांना विवेकवादाचा अर्थ समजलाच नाही असे म्हणणे भाग आहे.

पुढे वाचा

जाहिरातबाजीचे संकट

जपानमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग होता, इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ. तुमच्या उत्पादनांमध्ये दोष दाखवायला जागा नव्हती. मग तुमच्या देशावर एक खोटेपणाची लाट येऊन आदळली, व्यापार म्हणजे व्यापारच आणि इमानदारी म्हणजे फक्त एक चांगले धोरण, असे मानणाऱ्या प्रदेशातून ही लाट आली. शहरी क्षेत्रे काबीज करून आता इमानदारीने मेहेनत करणाऱ्या क्षेत्रावर हल्ला करणाऱ्या खोट्या आणि अतिशयोक्त जाहिरातींकडे स्वागत करणाऱ्या गिरिशिखरांवरही आता हल्ला होतो आहे. आपल्या कुरूप आणि रानवट सजावटींमधून घेणारा हा वाणिज्यवाद सर्व मानवजातीवर महा-अरिष्ट आणतो आहे, कारण कौशल्यावर तो ताकदीचे ‘आदर्श’ कलम करतो आहे.

पुढे वाचा