मासिक संग्रह: एप्रिल, २०१३

जात-पात


जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक ह्यांना कधीच आळा घालता येणार नाही.

मानवी अस्तित्व (८)

मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?

आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न ओघाने आलाच. पैकी चेतन सृष्टीतला जो मी आहे, तो तरी खरा आहे का इथपर्यंत त्याची शंका पोहोचली. मग त्यावर, अशी शंका घेणारा कुणीतरी आहे, म्हणजे मग तोच मी आहे असे त्याने स्वतःच्या प्रश्नाला उत्तर दिले.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे.

पुढे वाचा

चार फुले

हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे
एक छोटंसं मूल आहे
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे.
चार फुलं फुलली आहे.
इशारा हा की अजून आनंद आहे
आणि माठात भरलेले पाणी पिण्यायोग्य आहे.
हवेत श्वास घेतला जाऊ शकतो अजूनही
आणि इशारा हा की जगही आहे
उरलेल्या जगात मीही आहे उरलेला.
हा इशाराच की मी अजून उरलो आहे
एखाद्या संभवनीय युद्धातून जिवंत वाचून,
मी आपल्या इच्छेनुसार मरू इच्छितो,
आणि मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
अनंतकाळ जगण्याची कामना करतो.
कारण अजून चार फुलं आहेत आणि जग आहे.

पुढे वाचा