मासिक संग्रह: जानेवारी, २०१४

पत्रसंवाद

तारक काटे, धरामित्र, वर्धा

[आजचा सुधारक च्या जुलै २०१३ (२४-०५) च्या अंकात ‘बीज स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीजसंवर्धनाचे महत्त्व’ हा तारक काटे ह्यांचा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय शेतीची बलस्थाने काय होती. त्यानंतर आलेले संकरित बियाणे व त्यानंतर जनुकीय बदलांद्वारे निर्माण करण्यात आलेले बियाणे ह्या दोन गोष्टींमुळे शेतीव्यवस्थेत काय परिवर्तन झाले व त्या परिवर्तनाची दिशा काय आहे ह्याचे विवेचन करून पारंपरिक पद्धतीच्या बीजसंवर्धनाचा पुरस्कार केला होता. त्यावर राजीव जोशी ह्यांनी दिलेली प्रतिक्रिया, जी नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झाली, ज्यामध्ये जोशी ह्यांनी, वस्तुस्थिती आपल्याला माहीत नाही, परंतु काटे ह्यांचे म्हणणे तर्कास पटत नाही असे सांगून व साईड इफेक्ट्स असले म्हणून नवीन शास्त्र स्वीकारायचेच नाही काय ?

पुढे वाचा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’तील सुधारणा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’ २०१२ मध्ये पिण्याचे आणि स्वच्छतेचे पाणी सोडल्यास बाकी सर्व पाण्याला आर्थिक वस्तू समजले जावे असे सुचवले गेले. नंतरच्या आवृत्त्यां ध्ये अन्नसुरक्षा आणि शेतीसाठीचे पाणी ही प्राथमिक गरज समजली जावी याची खातरजमा करण्यात आली. १९९५ मध्ये घडलेली एक घटना आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात ताजी आहे. मी एका मित्रासोबत कोई तूर च्या गर्दीच्या बाजारात खरेदी करीत असताना एक महागडी गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या खिडकीतून दोन हात बाहेर आले. दुकानातून नुकत्याच खरेदी केलेल्या एक लिटरच्या मिनरल बाटलीतल्या पाण्याने ते हात धुतले गेले.

पुढे वाचा

नवी लढाई

मानवी दु:खे, मानवी हक्क, आधुनिक विज्ञान, सामाजिक न्याय व नीतिमूल्ये लक्षात घेऊन वेळोवेळी पुरोगामी कायदेकानून बनवावे लागतात.’ आधुनिक पुरोगामी राष्ट्र असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या भारताच्या संविधानाने नागरिकांना बहाल केलेले अधिकारः अनुच्छेद १४ : सर्व नागरिक समान आहेत. अनुच्छेद १५ : नागरिकांध्ये लिंगावरून (अर्थात लिंगभावावरूनही) भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद २१ : सर्व भारतीयाना स्वतःचे खाजगी आयुष्य प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे.
मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात न्याय व नीती हातात हात घेऊन वावरत असतात. अज्ञान व त्यातून उद्भवणारा अन्याय नव्या ज्ञानाच्या आधारे दूर करीत जावे लागते.

पुढे वाचा

हेरगिरी आणि शहाणपण

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रेट ब्रिटन (यापुढे ‘ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’) ही जगातली एकमेव महासत्ता होती. एकोणिसावे शतक संपताना तिचे साम्राज्य विरायला लागले; कुठेकुठे तर फाटायला लागले. पहिल्या महायुद्धाने इंग्लंडला स्पर्धक उत्पन्न होत आहेत हे अधिकच ठसवले. ते युद्ध जिंकायला इंग्लंडला यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची (यापुढे ‘अमेरिका’) मदत लागली, आणि अमेरिका महासत्ता आहे हे जाहीर झाले.
पहिल्या महायुद्धाच्या (१९१४-१८) मध्यावर युरोपच्या पूर्व टोकाला एका नव्या देशाचा उदय झाला, यूनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यापुढे ‘सोव्हिएत रशिया’). जुन्या झारवादी रशियन साम्राज्याचा वारस असलेला हा देश अनेक अर्थांनी ‘न भूतो’ असा होता.

पुढे वाचा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धानिर्मूलनाचे वाटसरू श्री. नरेन्द्र दाभोलकर ह्यांची हत्या झाली. तेव्हापासून ह्या विषयावर बरीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ह्यानिमित्ताने, श्रद्धा काय आहे. अंधश्रद्धा कशाला म्हणायचे, हे समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या व चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या विनोबांच्या विचारपुष्पांना मी त्यांच्याच भाषेत आपल्यापुढे ठेवीत आहे –
१) श्रद्धा आणि बुद्धी * श्रद्धा आणि बुद्धी यां ध्ये फरक जरूर आहे, परंतु विरोध मात्र मुळीच नाही. बुद्धीचे उगमस्थान विचारशक्ती आहे, तर श्रद्धेचे उगमस्थान प्राण-शक्ती आहे. * बुद्धीचे काम आहे ज्ञान सांगणे, श्रद्धेचे काम त्या ज्ञानावर स्थिर करणे आहे.

पुढे वाचा

प्रेम आणि द्वेष

कोणाही व्यक्तीच्या कातडीचा रंग, पार्श्वभूमी, किंवा तिच्या धर्मावरून तिचा द्वेष करीत कोणी जन्माला येत नाही द्वेष करायला शिकवावे लागते, आणि जर माणसांना द्वेष करायला शिकवता येत असेल, तर त्यांना प्रेम करायलाही शिकवता येऊ शकेल, कारण द्वेष करण्यापेक्षा प्रेम करणे माणसाच्या हृदयाला अधिक सहजसाध्य आहे.
— नेल्सन मंडेला