भारताचा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधला क्रमांक जेव्हा जाहीर होतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या दिसतात. एक गट मोठ्याने म्हणतो – “हे सगळं खोटं आहे, आपण इतके दुःखी नसतो!” दुसरा गट एका डोळ्याने रडत आणि एका डोळ्याने हसत म्हणतो – “पाहा, पाहा, हेच तर आपल्या रोजच्या वास्तवाचं चित्र आहे.” तिसरा गट मात्र शांतपणे डोकं खाजवत विचारतो – “खरंच हे आकडे सांगतात ते आणि तेवढंच सत्य आहे का? की हा फक्त आकड्यांचा खेळ आहे?” सोशल मीडियावर मीम्स लगेच तयार होतात : गर्दीने गच्च भरलेली लोकल, आणि कॅप्शन – “World Happiness Report, India Edition.”
कोऽहं!
आस्तिक्य किंवा नास्तिक्याविषयी विचार करताना एकंदर माझ्या असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे नास्तिक असणे हे आस्तिकांना तर खटकतेच, पण नास्तिकांना तिच्या नास्तिकपणाच्या खरेपणाविषयी येताजाता टिका करणे, त्याहून जास्त आवडते.
‘नास्तिक म्हणवते आणि हिच्याकडे देवघर आहे’
‘नास्तिक म्हणवते आणि ही दररोज दारात रांगोळी काढते’
‘नास्तिक म्हणवते आणि ही दिवाळीला दिवे लावते’
‘नास्तिक म्हणवते आणि ही सणासुदीला झेंडूच्या माळांनी घर सजवते’
ह्या आणि अशा टीका सतत एका प्रकारचे नास्तिक दुसऱ्या प्रकारच्या नास्तिकांवर करत असतात.
मला वाटते मूळात ‘नास्तिक’ ह्या शब्दाचा अर्थ त्यांना कळलेला नसतो.
जागतिक आनंद निर्देशांक
जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास समाधान नेटवर्कचं एक वार्षिक प्रकाशन आहे. मार्च २०२५ मध्ये, फिनलँड सलग आठव्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो.
राष्ट्रीय आनंदाची क्रमवारी कॅन्ट्रिल लॅडर सर्वेक्षणावर आधारित आहे. यात सहभागींना एक शिडीची कल्पना करायला लावली जाते, ज्यात १० म्हणजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आयुष्य आणि ० म्हणजे सर्वात वाईट आयुष्य. त्यानंतर त्यांना त्यांच्या सध्याच्या आयुष्याला ० ते १० च्या प्रमाणात मोजायला सांगितलं जातं. यात शीर्षस्थानी असलेल्या सर्व देशांमध्ये सहा प्रमुख घटकांचं मूल्य जास्त आहे, जे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत: उत्पन्न, निरोगी आयुष्य, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य.
सुखाचा शोध
सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?
कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण मार्गक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत.
सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने
“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम हे ऐहिक सुखाशी निगडित आहेत, पण त्यांना धर्म हा नियंत्रक घटक व मोक्ष हा अंतिम परिपाक आहे. म्हणजेच सुखाचा शोध वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीशी बांधलेला आहे.
चार्वाक — तर्काचा बंडखोर
नाकारले वेदांचे प्रामाण्य
तर्काचा तो बंडखोर—चार्वाक
इंद्रियप्रत्यक्ष सत्य मानले
अनुमान-आगम बुद्धीचे खेळ
ईश्वर नाही, आत्मा नाही
परलोकही केवळ कल्पना
“यावज्जीवं सुखं जीवेत”
विवेकातून आनंदाचा झरा
चार महाभूतांचा संगम
चैतन्य म्हणजे देहाचा योग
सृष्टी स्वाभाविक, ईश्वर नाही
भौतिकतेतच जीवनाचा भोग
नाही पाप, नाही पुण्य
नाही पुनर्जन्माचा व्यापार
जगणे म्हणजे अनुभवांचा उत्सव
नैतिकतेचा स्वाभाविक आधार
आज विज्ञानाचे युग उजळते
अनुभववादाची महत्ता ठळक
अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड
नाकारण्यातच प्रगतीचा मंत्र
डेटा, तर्क, प्रयोगशीलता
ज्ञानाचे खरे दीपस्तंभ
चार्वाक नाही अंतिम सत्य
पण विचारांना देतो दिशा
सुख म्हणजे भोग नव्हे केवळ
तर समता, सहजीवनाचा अर्थ
चार्वाक सांगतो—जगणे म्हणजे
जागृत मनाने अर्थपूर्ण जीवन
चेंजमेकर, बहुभाषिक अभ्यासक व स्तंभ लेखक
छ.
सुखाची बहुआयामी संकल्पना आणि भारतीय दृष्टिकोन
भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत एक अत्यंत मानवी असा आशीर्वाद वारंवार उच्चारला जातो “सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः”. याचा सरळ अर्थ असा की सर्व लोक सुखी व्हावेत, सर्व लोक निरोगी राहावेत. प्राचीन ऋषींच्या चिंतनातून उमटलेली ही भावना इतकी वैश्विक होती की तिच्यात कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, राष्ट्र यांचे बंधन नव्हते. ही भावना म्हणजे भारतीय विचारसरणीच्या सार्वत्रिक मानवी दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. मानवी जीवनाचा ध्यास केवळ मोक्ष, परलोक, आत्मसाक्षात्कार एवढ्यावर मर्यादित नसून, प्रत्यक्ष जगात लोकांनी सुखाने जगावे, ही देखील ह्या विचारांच्या मुळाशी असलेली आकांक्षा होती.
आवाहन
स्नेह.
सर्वेपि सुखिन: संतु — म्हणजेच सर्व लोक सुखी व्हावेत ही संकल्पना प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत ह्याला समांतर कल्पना “the greatest good for the greatest number” ह्या उपयोगितावादी तत्त्वज्ञानातून व्यक्त झाली आहे.
ह्याच संदर्भात चार्वाक किंवा लोकायत, ह्या प्राचीन भारतीय इहवादी विचारसरणीची आठवण होते. लोकायताचे वैशिष्ट्य असे समजतात की त्यात केवळ प्रत्यक्षच प्रमाण मानले जात असे. त्यामुळे शब्दाधारित वेद, अनुभवता न येणारे परलोक, व देव, ह्या तिघांनाही त्यात फेटाळून लावले होते. ह्या जगात प्रत्यक्ष अनुभवलेलेच खरे, बाकी आत्मा, पुनर्जन्म, परलोक, ह्या साऱ्या केवळ कल्पना.
मनोगत
ग्रामस्वराज्यावरील हा विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल ह्यांच्या कार्यास समर्पित आहे. ह्याविषयी आमचे मित्र सोपान जोशी ह्यांच्याशी होत असलेल्या चर्चेतून निघाले की अंकाचा आवाका वाढवायचा तर ह्यात महाराष्ट्राबाहेरील अनुभवदेखील यायला हवे. अनुषंगाने हिंदी भाषेतील लेखही ह्या अंकात समाविष्ट झाले. त्याची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने एरवी एप्रिलमध्ये प्रकाशित होणारा अंक आपल्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहोत.
स्वातंत्र्य म्हणजे आपले निर्णय आपण घेण्याचा अधिकार. मग ते व्यक्तिगत पातळीवरचे असोत की सामाजिक. ज्यांना स्वातंत्र्य प्रिय असते ते त्याची किंमत, प्रसंगी खडतर आयुष्य स्वीकारून चुकवण्यास तयार असतात.
मनोगत – हिंदी
ग्राम स्वराज्य पर यह विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल और उनके काम को समर्पित है. इस अंक का स्वरूप जरा अलग है. हमारे मित्र सोपान जोशी से बातचीत के दौरान यह लगा कि इस विषय पर महाराष्ट्र के बाहर के अनुभव भी इसमें शामिल होने चाहिए. वही बात आगे बढ़ी और यह तय हुआ कि हिंदी के लेख भी होने चाहिए. इन प्रयत्नों की वजह से इस अंक को तैयार करने में अधिक समय लगा. अप्रैल में प्रकाशित होने वाला अंक अब आ रहा है.