कार्ल पॉपर - लेख सूची

प्लेटोचे रिपब्लिक

प्लेटोचा Republic हा ग्रंथ न्याय या विषयावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांपैकी सर्वांत काळजीपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात न्यायाविषयीच्या अनेक मतांचे परीक्षण आले असून, ते अशा थाटात केले गेले आहे की त्यात प्लेटोने त्याला माहीत असलेल्या सर्व उपपत्तींचा समावेश केला आहे असे वाटावे. … परंतु अस्तित्वात असलेल्या उपपत्तींची चर्चा आणि चिकित्सा करताना न्याय म्हणजे …

‘सर्व माणसे समान आहेत’

मानवी व्यक्ती, जगातील सर्वच वस्तूंप्रमाणे, अनके बाबतीत असमान असतात हे नाकारणे अर्थातच शक्य नाही; आणि तसेच ही असमानता अतिशय महत्त्वाची आहे, आणि काही बाबतीत अत्यंत इष्टही आहे हेही निःसंशय….पण या सर्व गोष्टी मनुष्यांना विशेषतः राजकीय बाबतीत समान म्हणून, निदान शक्य तितके समान म्हणून वागविण्याचे आपण ठरवावे का, म्हणजे समान हक्क आणि समान वागणूक मिळण्यास पात्र …

हा मानवजातीचा इतिहास नव्हे!

ज्याला लोक इतिहास समजतात तो म्हणजे ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण, मॅसिडोनिया आणि रोम इत्यादींच्या साम्राज्यांपासून थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास. ते त्याला मानवाचा इतिहास म्हणतात, पण त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट. (जी ते शाळेत शिकतात) म्हणजे राजकीय शक्तींचा इतिहास होय. मानवाचा इतिहास नाही; मानवी जीवनाच्या विविध अंगांचे अनेक इतिहास तेवढे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक राजकीय शक्तींचा इतिहास आहे. …

वास्तवे आणि मूल्ये

निसर्ग किंवा इतिहास कोणीही आपण काय करावे हे शिकवू शकत नाही. नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वास्तवे (facts) यांपैकी कोणीही आपले निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणती साध्ये स्वीकारणार आहोत हे ती सांगू शकत नाहीत. निसर्गात किंवा इतिहासात हेतू आणि अर्थ आपण घालतो. मनुष्ये समान नाहीत; परंतु समान हक्कांकरिता झगडायचे आपण ठरवू शकतो. राज्यासारख्या मानवी संस्था विवेकी …

सर्व हितांची रक्षक लोकशाही

जिची मासिस्ट मंडळी केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणून हेटाळणी करतात ती – म्हणजे लोकशाही – वस्तुतः सर्व हितांचा आधार आहे. हे केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा आपल्या शासनकर्त्यांची परीक्षा करून त्यांना अधिकारावरून दूर करण्याचा हक्क. राजकीय शक्तींच्या दुरुपयोगापासून आपले रक्षण करण्याचा तो एकमेव ज्ञात उपाय आहे. ते शासितांकडून शास्त्यांचे नियंत्रण आहे.आणि राजकीय शक्ती आर्थिक शक्तींचे नियंत्रण …

‘विवेक’ आणि ‘विवेकवाद यांचे अर्थ

‘विवेक (reason) आणि ‘विवेकवाद’ (ratinalism) हे शब्द संदिग्ध असल्यामुळे त्यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले अर्थ सांगणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे शब्द व्यापक अर्थाने वापरले आहेत. त्यांनी एक बौद्धिक व्यापारच अभिप्रेत आहे असे नसून त्याखेरीज निरीक्षण आणि प्रयोग यांचाही त्यांच्या अर्थात अंतर्भाव आहे. हे लक्षात ठेवणे जरुर आहे कारण reason’ आणि ‘rationalism’ हे शब्द अनेकदा …

वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता

निसर्गविषयक विज्ञानाची दोन वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. ती दोन मिळून जिला ‘वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता’ म्हणता येईल ती बनते. पहिले वैशिष्ट्य मुक्त टीका. आपल्या उपपत्तीवर आक्षेप घ्यायला जागा नाही अशी वैज्ञानिकाची खात्री असेल; परंतु तिचा त्याच्या सहकारी आणि स्पर्धक वैज्ञानिकांवर काही प्रभाव पडणार नाही, उलट ती त्यांना आव्हान वाटेल. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे सर्व गोष्टींची परीक्षा घेणे, आणि …

लोकशाही तत्त्वाचा उद्देश

लोकशाही तत्त्वाचा उद्देश जुलूमशाही टाळण्याकरिता राजकीय संस्थांची निर्मिती, विकास आणि रक्षण करणे हा आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण या प्रकारच्या निर्दोष किंवा अभ्रंश्य संस्था कधी काळी निर्मू शकू, किंवा त्या संस्था अशी शाश्वती देऊ शकतील की लोकशाही शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर, चांगला किंवा शहाणपणाचाच असेल. पण त्या तत्त्वाच्या स्वीकारात असे नक्कीच व्यंजित …

लोकशाही आणि हुकूमशाही

शासनांचे दोन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारचे शासन म्हणजे ज्याचा अंत रक्तपातावाचून करता येतो ते, उदा. सार्वत्रिक निवडणुकांनी. अशा व्यवस्थेत ज्यांच्या साह्याने राज्यकर्त्यांना बडतर्फ करता येईल अशा संस्था असतात, आणि त्या संस्थांचा विध्वंस राज्यकर्ते करू शकणार नाहीत इतक्या मजबूत सामाजिक परंपरा असतात. दुसर्या् प्रकारात शासनाचा शेवट शासित केवळ यशस्वी क्रांतीनेच करू शकतात, म्हणजे अर्थात् बहुधा …