डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेख सूची

साला माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान

मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे …

लोकशाहीची तीन पथ्ये

लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक …

संत आणि चातुर्वण्र्य

चातुर्वण्याविरुद्ध आजवर अनेक बंडे झाली. त्यांत महाराष्ट्रातील भागवतधर्मी साधुसंतांचे बंड़ प्रमुख होय. पण या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शुद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधुसंत पडले नाहीत. या बंडात साधुसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले. …

समतावाद्यांचे ध्येय

समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वाना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही लोकांना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समताप्रस्थापनाच्या ध्येयाला विरोध करणे होय. ह्या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण …