संपादक-१९९० - लेख सूची

ह्या विशेषांकाविषयी

नवा सुधारकाचा हा वा.म. जोशी विशेषांक वाचकांच्या हाती देताना आमची मनोवस्था काही संमिश्र अशी झाली आहे. जुलै ९० च्या अंकात आम्ही हा अंक काढणार असल्याचे जाहीर केले तेव्हा विशेषांक प्रकाशित करणे किती दुरापास्त असते याची आम्हाला कल्पना होती. साहित्य वेळेवर मिळणे कठीण असते, हे एक तर खरेच; पण त्याचा आम्हाला फारसा प्रतिकूल अनुभव आला नाही. …

वामन मल्हार जोशी

वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता …

‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ

दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म. गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक’ चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत. ‘नवा सुधारक’च्या …

संपादकीय

‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणाऱ्या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध …